शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शीतलहरींनी जिल्ह्यात गारठा

By admin | Updated: January 15, 2017 00:44 IST

आॅक्टोबर ते जानेवारी हा कालावधी साधारणत: हिवाळ्याचा मानला जातो. यातील डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडून

पारा ८ अंशांखाली जाण्याचा अंदाज : कमाल तापमानातही होतेय घट श्रेया केने वर्धा आॅक्टोबर ते जानेवारी हा कालावधी साधारणत: हिवाळ्याचा मानला जातो. यातील डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडून जानेवारी मध्यापर्यंत हुडहुडी कमी होते; पण यंदा उत्तरेकडे वाहणाऱ्या शीतलहरी आणि बर्फवृष्टीमुळे जिल्हा गारठणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या जिल्ह्यात पारा ९ अंशांपर्यंत घसरला आहे. आणखी चार-पाच दिवस हुडहुडी भरणारी थंडी पडणार असून पारा ७-८ अंशांपर्यंत घसरेल, असा अंदाजही वर्तविला जात आहे. जानेवारी महिन्यातील मकरसंक्रांतीनंतर थंडीचा जोर कमी होतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने कडाक्याच्या थंडीचे मानले जातात; पण यंदा या दोन्ही महिन्यात विशेष थंडी जाणवली नाही. डिसेंबर महिन्यात काही प्रमाणात पारा घसरला होता. साधरण १२ ते १० अंशांपर्यंत पारा घसरला होती. काही दिवस ९.५ अंशांवर पारा घसरला होता. यानंतर ढगाळ वातावरणामुळे पुन्हा थंडीचा जोर कमी झाला. जानेवारी महिन्याच्या प्रारंभी विशेष थंडी नसल्याने हिवाळा संपला तर नाही ना, अशी भीतीही व्यक्त होत होती; पण ही भीती व्यर्थ ठरली. जानेवारी महिन्याच्या दहा दिवसांनंतर थंडीचा जोर आणखी वाढला. १०-११ अंशांपर्यंत गेलेला पारा पुन्हा कमी झाला. काल-परवापर्यंत ९ अंशांपर्यंत पारा खाली आला आहे. शिवाय कमाल तापमानातही घट होत असल्याने दिवसभर हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. सर्व ऋतूमध्ये वर्धा जिल्ह्यातील साधारण तापमान ३० ते ३५ अंशांपर्यंत असते; पण यंदा कमाल तापमानही मोठ्या प्रमाणात घसरले. पारा २५ अंशांपर्यंत घसरल्याने दिवसभर थंडी जाणवत असल्याचे दिसते. कमाल आणि किमान दोन्ही तापमानामध्ये घसरण होत असल्याने जिल्हा गारठत असल्याचेच चित्र आहे. या हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा नागरिक, पर्यटक आनंद लुटत असून पिकांनाही काही प्रमाणात फायदा होत असल्याचे दिसते. रबी हंगामातील गहू, चणा पिकांना या गुलाबी थंडीचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पिके जोमात असून उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी तूर पिकाला १० अंशांच्या खाली गेलेल्या पाऱ्यामुळे नुकसान होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. कमाल तापमानातही घट ऋतू कोणताही असला तरी वर्धा जिल्ह्यातील तापमान ३० ते ३५ अंशांपर्यंत नोंदले गेले आहे; पण यंदा कमाल तापमानातही कमालीची घट होत आहे. शुक्रवारी कमाल तापमान २५ अंशांपर्यंत खाली आले होते. या तापमानातही आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पारा आणखी घसरणार उत्तरेकडे सध्या शीतलहर सुरू आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणामही जिल्ह्यावर होत असल्याचे सांगण्यात येते. सध्या ९ अंशांपर्यंत घसरलेला पारा ७ ते ८ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे थंडीचा कालावधीही आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वातावरणातील आर्द्रता घटत असल्याने जानेवारी महिन्यातही थंडीचा जोर वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. ही थंडी आणखी चार ते पाच दिवस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हुडहुडी भरविणारी ही थंडी नागरिकांना सुखावणारी ठरणार आहे.