शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

शहरातील बजाज चौक, आर्वी नाका चौक, छत्रपती शिवाजी चौक, दादाजी धुनिवाले चौक, सिव्हिल लाइन परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी कोटी रुपयांच्या जवळपास निधी खर्च करून हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. एप्रिल महिन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाला आग लागल्यानंतर तांत्रिक बिघाड निर्माण झाला. तेव्हापासून सीसीटीव्ही कॅमेरे बंदच आहे.

ठळक मुद्देशहरात फोफावतेय गुन्हेगारी। सुरू करण्याकरिता नगरपालिका, पोलीस प्रशासन उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी शहरातील विविध प्रमुख चौकांत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सद्यस्थितीत शोभेची वस्तू ठरत आहेत. मागील सहा महिन्यांपासून शहरात या यंत्रणेने पूर्णत: डोळे मिटलेले असल्याचे चित्र आहे.नगरपालिकेच्या वतीने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत २०१४-१५ मध्ये चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीमधून शहरातील प्रमुख चौकांत कॅमेरे लावण्याकरिता एक कोटींच्या जवळपास निधीची तरतूद करण्यात आली होती. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर कंत्राटदाराला हे कॅमेरे लावण्याचा कंत्राट देण्यात आला होता. महत्त्वपूर्ण विविध चौकात ४८ वर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. देखभाल दुरुस्तीची व्यवस्थाही करण्यात आली. या कॅमेऱ्यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला. या कक्षात लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर शहरातील विविध भागातील फुटेज दिसू लागले. यातून संपूर्ण शहरावर तिसºया डोळ्यातून लक्ष ठेवणे सुरू झाले. पोलीस प्रशासनाला आरोपींचा शोध घेण्यास मोलाची मदत होऊ लागली.मात्र, एप्रिल महिन्यात नियंत्रण कक्षाला लागलेल्या आगीमुळे ही यंत्रणा बंद झाली. आजतागायत ही यंत्रणा डोळे मिटलेलीच आहे. सहा महिन्यांपासून ही यंत्रणा बंद असताना ती सुरू करण्याच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासन, पोलीस विभागाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे शोभेचे ठरत असून सोनसाखळी पळविणे, मुलींची छेडखानी, रॅश ड्रायव्हिंग आदी प्रकाराला ऊत आलेला आहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटूनही सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात न आल्याने यावर खर्च झालेला निधीही पाण्यात जातो की काय, या शनकेला वाव मिळत आहे.शहरातील या प्रमुख चौकांत लागले होते सीसीटीव्ही कॅमेरेशहरातील बजाज चौक, आर्वी नाका चौक, छत्रपती शिवाजी चौक, दादाजी धुनिवाले चौक, सिव्हिल लाइन परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी कोटी रुपयांच्या जवळपास निधी खर्च करून हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. एप्रिल महिन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाला आग लागल्यानंतर तांत्रिक बिघाड निर्माण झाला. तेव्हापासून सीसीटीव्ही कॅमेरे बंदच आहे.उद्घोषणा देणेही झाले बंदसीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासोबतच महत्त्वाच्या प्रमुख चौकात उद्घोषणा करण्याकरिता ध्वनिक्षेपक लावण्यात आले होते. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यास संबंधित वाहनमालकांना नियंत्रण कक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना दिल्या जात होत्या. ही यंत्रणाही वर्षभरापासून बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ध्वनिक्षेपकही शोभेचेच ठरत आहेत.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही