शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बसफेरीच्या मागणीसाठी अडवली बस

By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST

तीन वर्षांपासून हिंगणघाट ते कवठा बसफेरीच्या मागणीसाठी विद्यार्थी वारंवार निवेदने देत आहेत;

समुद्रपूर : तीन वर्षांपासून हिंगणघाट ते कवठा बसफेरीच्या मागणीसाठी विद्यार्थी वारंवार निवेदने देत आहेत; पण राज्य परिवहन महामंडळ टाळाटाळ करीत असून वेळकाढू धोरण अवलंबित आहे़ यामुळे प्रहार संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेत बुधवारी रस्तारोको आंदोलन केले़ हिंगणघाट आगाराची बस अडवून धरताच गुरुवारपासून बसफेरी सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले़ यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले़स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६८ वर्षानंतरही कवठा, किन्ही या गावात बसफेरी सुरू झाली नाही़ शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना पाच किमीची पापपीट करीत निंभा येथे जावे लागते. नागरिकांना दुचाकी वा पायी प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो़ ही अडचण लक्षात घेत प्रहार संघटनेने १९ डिसेंबर १३ रोजी हिंगणघाट-कवठा किन्ही बसफेरी सुरू करण्याची मागणी केली़ याबाबत हिंगणघाट आगार प्रमुखांना निवेदन दिले़ यानंतर निंभा ते कवठा रस्ता नादुरूस्त असल्याचे व गावात बस पलटविण्यास अपुरी जागा असल्याने बसफेरी सुरू करता येणार नाही, असे कळविण्यात आले. गतवर्षी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत निंभा ते कवठा किन्ही पक्क्या रस्त्याचे बांधकाम झाले. प्रहार संघटना व ग्रामस्थांनी गावातील कचरा साफ करीत बस पलटविण्यासाठी जागा केली. पुन्हा ६ जानेवारी १५ रोजी त्रुटींची पुर्तता केल्याचे पत्र विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ वर्धा येथे देण्यात आले. तेव्हा दर, टप्पा ठरविल्यावर बसफेरी सुरू होईल, असे सांगण्यात आले; पण हे आश्वासन पाळले नाही. यानंतर पुन्हा निवेदने देण्यात आली; पण कारवाई न झाल्याने अखेर बुधवारी बस अडवून धरण्यात आली़ या आंदोलनात तालुकाध्यक्ष देवा धोटे, प्रवीण जायदे, शरद काटुके, योगेश भेंडे, प्रशांत धोबे, अश्विन धाके, गोलू पन्नासे, मनोहर हिवरकर, आशिष नागपुरे, सचिन फाळेकर, आकाश राऊत तसेच गावातील महिला, पुरुष व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.(तालुका प्रतिनिधी)