श्री सूर्याच्या जप्त केलेल्या बसचा सौदागिट्टीखदानमध्ये फसवणूक : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल नागपूर :पोलिसांच्या देखरेखीखाली असलेली श्री सूर्या कंपनीच्या जप्त केलेल्या स्कूल बसचा सौदा करून दोघांनी २ लाख रुपयांचा जुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगेश रमेश चोपडे (२७) रा. चौबे कटिया भंडारजवळ बोरगाव रोड गिट्टीखदान, आणि तोहन किशोर तायवाडे अशी आरोपीची नावे आहेत. पोलीस सूत्रानुसार ५ मार्च २०१४ ते ३० एप्रिल दरम्यान आरोपींनी संगनमत करून देवेंद्र जगदीशराव रेवतकर (३०) रा. दोळकी ता. काटोल यांना पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस ग्राऊंडजवळ उभी असलेली श्री सूर्या कंपनीची (एम.एच.३१-डीएच-७०३) क्रमांकाची स्कूल बस दाखविली. ही बस तोहनच्या मालकीची असल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्रने बस पाहून ४ लाख ८० हजारात सौदा केला. टोकन स्वरूपात २ लाख रुपये दिले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देवेंद्रने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
श्री सूर्याच्या जप्त केलेल्या बसचा सौदा
By admin | Updated: May 3, 2014 16:42 IST