संघर्ष जाधव - केळझर ऐतिहासिकदृष्ट्या सुपरिचित असलेल्या व रामजन्मापूर्वी ‘एकचक्रनगर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या केळझरच्या भूमीतून आतापर्यंत अनेक मूर्ती खोदकाम करताना निघाल्यात. यातील काही मूर्ती पुरातत्व विभागाने नेल्यात तर काही मूर्तींची स्थापना करून गावकर्यांनी येथे मंदिरे उभारली. यातील काही मूर्ती विदेशातही गेल्या आहेत. तेथील विहाराची त्या शोभा वाढवित आहेत. ‘व्हाईट हॉर्स टेबल’ मध्ये भारतीय आणि चिनी संस्कृतीचा उद्भूत मिलाप दिसून येतो. सन १९६१-६२ च्या दरम्यान वर्धा जिल्ह्यातील केळझर या गावातील पुर्वेकडील मैदानात ‘धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील’ बुद्धमूर्ती चिनमध्ये नेली. तिथे ती विहारात ठेवण्यात आली आहे. आताही येथे खोदकाम केले तर मूर्ती सापडतील, अशी स्थिती आहे. येथील बर्याच मूर्ती पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी अभ्यासाकरिता नेल्या असून त्यांच्याचर संशोधन सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. यात बर्याच मूर्ती शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे. यामुळे या मूर्ती पाहणार्यांकरिता आकर्षणाच्या ठरत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. चिनमधील ल्युयो-यांग या शहराला सभ्यतेचे उगमस्थान मानले जाते. ऐतिहासिकदृष्ट्या २९ मे २0१0 ला भारताच्या तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चीन भेटीस गेल्या होत्या. ल्युमो-यांग येथे इ.स. १९६५ मध्ये भारतीय शैलीने बांधकाम केलेल्या विहाराला भेट दिली दिली. विहार पाहून त्या मंत्रमुग्ध झाल्या. ४५ वर्षांपूर्वी केळझर येथून नेलेल्या बौद्ध मूर्तीचा त्यांना परिचय करून देण्यात आला. ही मूर्ती भारतातील महाराष्ट्रामध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यातील केळझर येथील असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
केळझरच्या भूमीत मिळाल्यात पराकोटीच्या बुद्धमूर्ती
By admin | Updated: May 13, 2014 23:50 IST