शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कराच्या थकबाकीपोटी बीएसएनएल कार्यालय सील

By admin | Updated: March 28, 2017 01:02 IST

शहरातील बीएसएनएल कार्यालयाकडे पालिकेचा ४७ लाख ६५ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. थकीत कराच्या भरण्याकरिता .....

४७.६५ लाख थकले : नगर परिषदेची कार्यवाहीवर्धा : शहरातील बीएसएनएल कार्यालयाकडे पालिकेचा ४७ लाख ६५ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. थकीत कराच्या भरण्याकरिता बीएसएनएला वारंवार पालिकेच्यावतीने सूचना देण्यात आल्या; परंतु, कराचा भरणा झाला नसल्याने सोमवारी दुपारी पालिकेच्या करवसूली पथकाने बीएसएनएल कार्यालयाला सील ठोकले. यामुळे बीएसएनएल कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, सन २००० पासून शहरातील बीएसएनएल कार्यालयाने वर्धा न.प.च्या मालमत्ता कराचा भरणा केला नाही. यामुळे ४७ लाख ६५ हजार ४३ रुपयांचा कर थकला होता. कर भरण्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष वर्धा : पालिकेच्या थकीत कराचा भराणा करण्यासाठी पालिकेच्यावतीने बीएसएनएल कार्यालयाला वारंवार सूचना देण्यात आल्या. परंतु, या नोटीसला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी बीएसएनएलचे शहरातील कार्यालय गाठत कराचा भरणा करण्यासंदर्भात प्रतिसाद मिळाला नसल्याने वसूली पथकाने कार्यालयाला सील लावले. ही कार्यवाही वर्धा न.प.चे प्रशासकीय अधिकारी अजय बागरे, कर अधीक्षक रवी जगताप, अशोक वाघ, ज्ञानेश्वर परटक्के, गजानन पेटकर, दिलीप कुथे, सुनील जमाने, राजेश तांबेकर, प्रशांत मेंढे, विजय किनगावकर, वानखेडे, रवी सराह आदींनी केली.(शहर प्रतिनिधी) संधी मिळताच बाहेर काढले साहित्य वर्धा नगर पालिकेचे करवसूली पथक बीएसएनएल कार्यालय परिसरात दाखल झाल्यानंतर सुरूवातील अधिकाऱ्यांची चर्चा झाली. तात्काळ कराचा भरणा केल्यास जप्तीची कार्यवाही करणार नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कराचा भरणा करण्यासाठी योग्य प्रतिसाद न मिळत असल्याने शेवटी जप्तीची कार्यवाही सुरू झाली. यावेळी संधी मिळताच बीएसएनएल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील संगणक, प्रिंटर व रोख रक्कम बाहेर काढत इतर इमारतीत नेऊन ठेवली. एकूण जप्तीच्या कार्यवाहीमुळे बीएसएनएल कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.