शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पटवारी एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: July 1, 2014 23:37 IST

कृषी पंपाला वीज जोडणी मिळण्याकरिता सातबारावर विहिरीची नोंद करण्याकरिता ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर येथील पटवाऱ्याला एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

सातबारावर विहिरीची नोंद करण्याकरिता मागितले ५०० रुपयेवर्धा : कृषी पंपाला वीज जोडणी मिळण्याकरिता सातबारावर विहिरीची नोंद करण्याकरिता ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर येथील पटवाऱ्याला एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई हिंगणघाट पंचायत समितीसमोर असलेल्या एका हॉटेलात मंगळवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. एसीबीच्या जाळ्यात असलेल्या या पटवाऱ्याचे नाव अशोक मधुकर चन्नूरवार असे आहे.या बाबात थोडक्यात वृत्त असे की, हिंगणघाट तालुक्यातीन हिवरा येथील शेतकरी प्रमोद उगे याच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतात विहीर आहे. या विहिरीवर उगे याला कृषी पंप लावण्याकरिता सातबारावर विहिरीची नोंद करावयाची होती. याकरिता तो पटवारी अशोक चन्नूरवार याच्याकडे गेला. यावेळी पटवाऱ्याने त्याला नोंद करण्याकरिता पैसे लागतात, असे म्हटले. यावर शेतकऱ्याने त्याला नकार दिला. या कामाकरिता शेतकरी सतत पटवाऱ्याची संवाद साधत होता. यावर त्रासलेल्या पटवाऱ्याले शेतकरी उगे यांच्या सातबाऱ्यावर विहिरीची नोंद करून दिली.सातबाऱ्यावर नोंद केल्यानंतर सदर पटवाऱ्याने या शेतकऱ्याला तुझे काम केले, मला ५०० रुपये लागतील, असे म्हटले. यावर शेतकऱ्याने त्याला काही दिवस फिरविले. य पटवाऱ्याला अद्दल शिकवायची असे म्हणत त्याने या प्रकाराची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून सापळा रचून विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी त्याला पैसे घेताना रंगेहात पकडले. या पटवाऱ्यावर लाचलुप प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई एसीबीच्या नागपूर विभागाचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक निशिथरंजन मिश्रा यांच्या मार्गदर्शनात वर्धेचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर जमादार प्रदीप देशमुख, राजेश बुरबुरे, गिरीश कोरडे, मनिष घोडे, प्रदीप कदम यांनी केली. (प्रतिनिधी)