शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बीटी बियाणे जप्त

By admin | Updated: June 26, 2016 01:56 IST

कारंजा तालुक्यातील उमरी येथील चंद्रशेखर हरिभजन फरकाडे नामक व्यक्ती कपाशीची बोगस बीटी बियाणे विकत असल्याची माहिती....

पोलिसात तक्रार : कृषी विभागाच्या जिल्हा पथकाची कार्यवाहीवर्धा : कारंजा तालुक्यातील उमरी येथील चंद्रशेखर हरिभजन फरकाडे नामक व्यक्ती कपाशीची बोगस बीटी बियाणे विकत असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हा पथकाला मिळाली. कृषी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीवरून शुक्रवारी रात्री धाड घातली असता सदर इसमाच्या घरी कुठलीही नोंद नसलेली बीटी बियाणे आढळून आले. या संदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कृषी विभागाच्या पथकाने जप्त केलेल्या बियाण्यांच्या पाकिटावर कुठलीही परवानगी असल्याची नोंद नव्हती. शिवाय बियाण्यांवर आवश्यक असलेला लॉट क्रमांक, किंमत अशी कुठल्याही नोंदी नसल्याचे आढळून आले. शिवाय या संदर्भातील कुठलीही माहिती फरताडे याच्याकडे उपलब्ध नव्हती. यावरून सदर बियाणे बोगस असल्याचे लक्षात आल्याने घरात आढळलेली तीन पाकिटे कृषी विभागाच्या पथकाने जप्त केली. याची तक्रार कारंजा पोलिसात केली असून चंद्रशेखर फरकाडे याच्या विरोधात बियाणे नियंत्रण आदेश १९८३, महाराष्ट्र कापूस अधिनियम २००९ व जीवनावश्यक वस्ते कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाले दिली. जिल्ह्यात मान्सूनचे आगमण झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पेरणीकरिता आवश्यक बियाण्यांकरिता त्यांची मान्यताप्राप्त कृषी केंद्रात गर्दी होत आहे. बियाण्यांकरिता होत असलेल्या गर्दीचा लाभ उचलत उमरी येथील फरकाडे याच्याकडून बोगस बियाणे विकण्याचा सपाटा सुरू असल्याची माहिती मिळताच जि. प. प्रभारी कृषी अधिकारी संजय बमनोटे, आर. धर्माधिकारी, कृषी विस्तार अधिकारी देवकर, गुण नियंत्रक दबरासे यांनी धाड घालून ही त्याचे बिंग फोडले. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.(प्रतिनिधी) घरी आढळली फक्त तीन पाकिटे फरकाडे याच्या घरावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली असता त्यांना आदेश ११ या नावाच्या बीटी बियाण्याची तीन पाकिटे मिळून आली. त्याने परिसरात या नावाची बरीच बियाणे विकल्याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांना मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्यास त्याने विकलेले बियाणे जप्त करणे सोईचे जाईल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.