शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या फीत लावून निषेध

By admin | Updated: August 26, 2016 02:08 IST

आयटकप्रणित अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या देशव्यापी जेलभरोनंतर केंद्र शासनाने अंगणवाडी,

आयटकचे आंदोलन : अंगणवाडी, गटप्रवर्तकांचा सहभागवर्धा : आयटकप्रणित अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या देशव्यापी जेलभरोनंतर केंद्र शासनाने अंगणवाडी, आशा व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीद्वारे प्राँव्हिडंड फंड (ईपीएफ) व एम्प्लाँईज स्टेट इशुरन्स (ईएसआयसी) मार्फत आरोग्य सेवेचा लाभ देण्याची ग्वाही केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी दिली. याबाबत २२ आॅगस्ट रोजी आदेश काढण्याचे सांगितले; पण अद्याप आदेश काढले नाही. यामुळे देवळी तालुक्यातील अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक यांनी काळी फीत लावून शासनाचा निषेध नोंदविला.जिल्ह्यात गुरूवारी अंगणवाडी सेविका, आशा व आरोग्य सेविका यांची प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सभा घेतली जाते. त्या सभेत महिला कर्मचारी, अंगणवाडी, आशा, गट प्रवर्तक यांनी काळी फीत लावून सभेत सहभाग घेत निषेध नोंदविला. शासनाविरूद्ध २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अंगणवाडी युनियनच्या तालुका सचिव रंजना तांबेकर, जिल्हाध्यक्ष संध्या म्हैसकर, देवळी तालुका अध्यक्ष योगीता डाहाके यांनी केले. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, प्रमोद धुळे, चंद्रकांत वाघुले, प्रमोद लकडे, प्रशांत आदमने, सुधा रामटेके यांनी पाठींबा दिला. आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी आयटक कार्यालय बोरगांव येथे ११ वाजता बैठक असल्याचेही कळविण्यात आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)