शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बिडकर महाविद्यालयात धाड

By admin | Updated: June 26, 2016 02:04 IST

स्थानिक रा.सु. बिडकर महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी शुल्क घेऊन

रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरूच : कार्यवाहीबाबत कमालीची गुप्तताहिंगणघाट : स्थानिक रा.सु. बिडकर महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी शुल्क घेऊन पावती देत नसल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा कार्यालयाच्या चमूने महाविद्यालयावर शनिवारी सकाळी धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरूच होती. कार्यवाहीत कमालीची गुप्तता बाळगली जात असल्याने नेमकी कोणती कार्यवाही करण्यात येत आहे, याबाबत कळू शकले नाही. प्राप्त माहितीनुसार, या विद्यालयाला १२० जागांसाठी बी.एस.सी. प्रथम वर्षाकरिता परवानगी आहे. नियमित प्रवेश शुल्क ३१० रुपये आकारण्यात येते; पण विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त पाच हजार रुपयांची मागणी होत असल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने लाचलुचपत शाखेकडे केल्याने ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांचे बयाण तसेच कागदपत्रे व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत राऊत यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देण्यास त्यांच्याकडून नकार देण्यात येत आहे. यामुळे या कारवाईत नेमके काय, याची माहिती कळू शकली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चमू सकाळपासून सायंकाळपर्यंत केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगत होती. यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रकार होत असल्याची चर्चाही महाविद्यालयाच्या आवारात होती. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, हवालदार संजय खल्लारकर, महिला पोलीस शिपाई रागिनी हिवाळे, अनुप राऊत, पल्लवी बोबडे, श्रीधर उईके यांचा समावेश आहे.(तालुका प्रतिनिधी)