शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांचे भजन आंदोलन

By admin | Updated: June 26, 2016 02:03 IST

स्थानिक अलाहाबाद बॅँकेच्या व्यवस्थापकाच्या हेकेखोर स्वभावामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत.

तहसीलदारांकडून चौकशी : शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज मंजूरविजयगोपाल : स्थानिक अलाहाबाद बॅँकेच्या व्यवस्थापकाच्या हेकेखोर स्वभावामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत. पीकर्जाकरिता गेलेल्या शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार येथे घडत असल्याने शेतकऱ्यांनी हातात टाळ घेऊन भजन आंदोलन केले. या आंदोलनाचा धसका घेत शेतकऱ्यांना अवघ्या एका तासात कर्ज मंजूर करण्यात आले. परिसरातील १६ गावांकरिता एकमेव बँक म्हणून येथील अलाहाबाद बॅँकेची ओळख आहे. या बॅँकेतून १६ गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज दिले जाते; पण गत एक वर्षापासून येथील व्यवस्थापक अभिजीत वानखडे शेतकऱ्यांना अकारण त्रास देत आहेत. या संदर्भात परिसरातील शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना निवेदन देण्यात आले होते. त्या काळात शेतकऱ्यांचा त्रास कमी झाला होता; पण आता पीककर्जाकरिता शेतकऱ्यांची गर्दी वाढत असताना तोच त्रास पुन्हा सुरू झाला होता. याच काळात तांभा व तळणी (भागवत) येथील दौलत बरडे, श्याम बरडे, जानराव नागपूरे, उमेश ठाकरे या शेतकऱ्यांना व्यवस्थापकाकडून त्रास वाढला. परिणामी, शेतकऱ्यांनी शुक्रवारी हातात टाळ घेत बॅँके समोरच भजन आंदोलन सुरू केले. याची दखल घेत एका तासातच तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी मंडळ अधिकारी राठोड यांना चौकशीसाठी बॅँकेत पाठविले. प्रशासनाने चौकशीचा बडगा उगारताच बँक व्यवस्थापकाने या शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मंजूर केले. येथील शेतकरी ठाकरे हे गत दोन महिन्यांपासून कर्जाकरिता बँकेत चकरा मारत होते. त्यांना ओलिताची सोय असलेला जमानतदार आणाल, तरच कर्ज मिळेल, असे सांगण्यात आले होते. सदर शेतकऱ्याने याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांना देताच त्यांनाही त्वरित कर्ज मंजूर करण्यात आले. इतर शेतकऱ्यांचेही कर्ज लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आंदोलनामुळे कर्जाचा मार्ग मोकळा झाला.(वार्ताहर)