शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

उत्तमच्या कामगारांना दुखापतीनुसार मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

ना. बच्चू कडू यांनी शनिवारी सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उत्तमच्या जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. सेवाग्राम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी कामगारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे, प्रशासकीय अधिकारी गिरीश देव, निता शेटे, डॉ. दिलीप गुप्ता, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे आदींची उपस्थिती होती. ना. कडू पुढे म्हणाले, उत्तम गलवा कंपनीत झालेल्या घटनेच्या संदर्भात काही अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू यांनी दिले आश्वासन : कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भूगाव येथील उत्तम गलवा स्ट्रील कंपनीत झालेला अपघात दुर्दैवी आहे. या प्रकरणी कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. यात जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर नक्कीच कठोर कारवाई हाेईल. राहिला प्रश्न जखमी कामगारांना आर्थिक मदत मिळण्याचा तर ज्यांना जशी दुखापत आहे त्यानुसारच त्यांना आर्थिक मदत कंपनीकडून दिली जाईल. त्यासाठी प्रयत्नही केले जाईल, असे आश्वासन जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण, बहूजन कल्याण विभाग व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.ना. बच्चू कडू यांनी शनिवारी सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उत्तमच्या जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. सेवाग्राम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी कामगारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे, प्रशासकीय अधिकारी गिरीश देव, निता शेटे, डॉ. दिलीप गुप्ता, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे आदींची उपस्थिती होती. ना. कडू पुढे म्हणाले, उत्तम गलवा कंपनीत झालेल्या घटनेच्या संदर्भात काही अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. ते अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्राप्त होईल. या प्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या हेतूने पोलीस विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. या प्रकरणी भादंविची कलम ३२४ तसेच ३०७ वाढविता येते काय याचीही माहिती घेतली जाईल. एकूणच हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांचा अंत केंद्र सरकारने पाहू नयेसंपूर्ण देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे असच दुर्लक्ष केले तर उद्रेक होईल. दिल्ली येथील आंदोलनाला दोन महिन्यापेक्षा अधिक वेळ झाला आहे. हे आंदोलन देशातील सर्वात मोठे आंदोलन आहे. मोदी सरकार ज्या पद्धतीन शेतकऱ्यवर वचपा काढण्याच्या पद्धतीने वागत आहे हे चुकिचे आहे. कायदा मागे घेतल्यावर नुकसान काय होईल, कोणाच्या तिजोऱ्या कमी होतील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करावे. नुकसान काहीच होत नसेल तर कायदा मागे घ्यायला अडचण काय आहे हा ही प्रश्न आहे. मला अस वाटत की सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये. असेच चालू राहील तर त्याचा उद्रेक होईल, हे मात्र निश्चित, असे मतही ना. बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू