शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादकांवर अस्मानी

By admin | Updated: June 5, 2015 02:12 IST

केळी बागायतदारांचा तालुका म्हणून सेलूची ओळख आहे; पण केळीच्या बागा नावापूरत्याच शिल्लक राहिल्या आहेत.

आर्थिक विवंचनेत भर : पारा ४७ अंशांवर गेल्याने बागा करपल्याविजय माहुरे सेलूकेळी बागायतदारांचा तालुका म्हणून सेलूची ओळख आहे; पण केळीच्या बागा नावापूरत्याच शिल्लक राहिल्या आहेत. यातही अस्मानी व सुलतानी संकटात त्या सापडल्या आहेत. गत १५ दिवसांतील वाढत्या तापमानामुळे तालुक्यातील केळीच्या बागा करपल्या आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.१८ महिन्यांचे केळीचे पीक महागडे आहे. या पिकाला उन्हाळ्याच्या दिवसांत व पावसाळा लागण्यापूर्वी येणाऱ्या वादळ, वाऱ्यापासून बचाव झाला तर केळीचे पीक पावसाळ्यात येणाऱ्या खरीप हंगामातील खर्चाला हातभार लावण्यास सार्थकी ठरते; पण यावर्षी मे महिन्यात पारा ४७ अंशांवर गेल्याने केळीच्या घडाला मार बसला. बहुतांश घडे गळून पडले तर पाने सुकण्याच्या मार्गावर होते. यामुळे सूर्याचे किरण बागायती शेतात जमिनीवर पडत असल्याने केलेले ओलित सुकत होते. यातच केळी उत्पादक शेतकऱ्याला वीज भारनियमनामुळे ओलितासाठी तारेवरची कसरत करावी लागली. रात्रीचा दिवस करण्याची वेळ त्यांच्यावर आली. अशातच मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळाने या परिश्रमावर काही प्रमाणात पाणी फेरले गेले. वडगाव रेहकी व घोराड शिवारात केळीची झाडे कोलमडून पडली. यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. वटपौर्णिमेपासून केळीचे घड कापून विक्रीस येत असत; पण अद्यापही कडक उन्ह तापत असल्याने कापणीला सुरूवात झालेली नाही.केळी पिकाला येणारा खर्च हा इतर पिकाच्या तुलनेत महागडा आहे. केळीचे रोपटेही नाशिक जिल्ह्यातून आणले जातात. यासाठी पैसे मोजावेच लागतात. शेणखत, रासायनिक खत, चाळण, ओढण, पाने कापणे आणि लावण तसेच केळीची झाडे खोदून बाहेर काढणे यासाठी वेळोवेळी खर्च करावा लागतो. हा खर्च पाहता केळीला परवडण्याजोगा भाव मिळेलच, याची शाश्वती राहिलेली नाही. ठिबक सिंचनासाठी केलेला खर्च व याच उत्पन्नावर असलेली आर्थिक घडी अस्मानी व सुलतानी संकटाने बिकट होत आहे. यामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह केळी उत्पादकही आर्थिक संकटात सापडले आहेत.१८ महिन्यांचे महागडे पीक १५ दिवसांच्या उन्हाने धोक्यातपूर्वी सेलू तालुक्यात सर्वाधिक केळी पिकविली जात होती. हे पीक १८ महिन्यांचे असून यासाठी मोठा खर्च करावा लागतो. केळीची रोपेही शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यातून आणावी लागतात. यासाठीही भरमसाठ खर्च लागतो. शिवाय १८ महिन्यांपर्यंत त्या पिकाची जपणूक करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची दमछाक होते. यातही हमखास उत्पादन होईलच, याची हमी राहिलेली नाही. उन्हाळ्यात तापमान अधिक वाढल्यास केळीच्या बागा कपरतात. मे महिन्यात सतत १५ दिवस पारा ४७ अंशांवर गेल्याने केळीच्या बागा धोक्यात आल्या असून शेतकरी त्रस्त झाले आहेत.