शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज कपातीकरिता बँकेने शेतकऱ्यांची खाती गोठविली

By admin | Updated: December 28, 2016 01:06 IST

येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेने पीक कर्जाची रक्कम थेट कपात करण्याकरिता शेतकऱ्यांची बँक खाती गोठविली आहे

शेतकरी आर्थिक संकटात : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागितली दाद हिंगणघाट : येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेने पीक कर्जाची रक्कम थेट कपात करण्याकरिता शेतकऱ्यांची बँक खाती गोठविली आहे. बँकेच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या बचत खात्यात रक्कम असूनही ती त्यांना मिळणे कठीण झाले आहे. आधी कर्ज भरा नंतरच खाती सुरू करू, असे बँकेचे अधिकारी सांगत आहेत. या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांची भेट घेऊन बँकेच्या या अन्यायपूर्वक धोरणापासून दिलासा देण्याची मागणी केली आहे. वेळा येथील शेतकरी पुंडलिक बोरकर आणि येरणगाव येथील शेतकरी वसंता मुडे यांनी बँकेतील आपल्या बचत खात्यात कापसाच्या चुकाऱ्याची रक्कम जमा केली. ते सोमवारी या खात्यातील पैसे काढण्याकरिता गेले असता त्यांना अधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. आपल्याकडे बँकेच्या पीक कर्जाची रक्कम थकीत असल्याने खाते गोठविले असल्याचे सांगण्यात आले. पुंडलिक बोरकर यांनी आठ क्विंटल कापूस बाजार समितीत विकला होता. यापोटी त्यांना ४० हजार रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. त्यांच्यावर बँकेचे ४९ हजार रुपयांचे कर्ज आहे. ते धनादेश वटविण्याकरिता बँकेत गेले असता पीक कर्ज भरल्याशिवाय रक्कम काढू शकणार नाही, असे सांगण्यात आले. वसंता मुडे यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. त्यांनी १६ क्विंटल कापूस येथील बाजार समितीत विकला. त्यापोटी त्यांना ६८ हजार रुपयांचा धनादेश मिळाला. त्यांच्यावर बँकेचे ९७ हजार रुपयांचे थकीत कर्ज आहे. त्यांचे खातेही बँकेने गोठविले आहे.(तालुका प्रतिनिधी)