शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

‘लिंक फेल’मुळे बँकेचे व्यवहार तीन दिवसांपासून ठप्प

By admin | Updated: August 24, 2014 00:10 IST

नजीकच्या पवनार येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतील व्यवहार लिंक नसल्याने तीन दिवसांपासून ठप्प आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या बँकेची कामे संथगतीने होत असल्याने आधीपासूनच

वर्धा : नजीकच्या पवनार येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतील व्यवहार लिंक नसल्याने तीन दिवसांपासून ठप्प आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या बँकेची कामे संथगतीने होत असल्याने आधीपासूनच नागरिक त्रस्त होते. तीन दिवसांपासून लिंक फेल, चा फटका बसल्याने ग्राहकांना व शेतकरी वर्गाला त्रास होत आहे. गावची लोकसंख्या १० हजारांच्या घरात असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात व्यवहार या बँकेमार्फत चालतात. बँकेत नागरिकांची कामे लवकर होत नसल्याची ओरड नेहमीच होत आहे. त्यातच तीन दिवसांपासून लिंक फेलच्या कारणातून सारे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. पवनार येथील सेंट्रल बँकेच्या शाखेसोबत गावासह कान्हापूर, मोर्चापूर, गोंदापूर, वाहितपूर, सुकळी(स्टेशन), रमणा तसेच परिसरातील विविध गावांतल्या शेतकऱ्यासह विविध नागरिकांचे आर्थिक व्यवहार चालतात. त्यामुळे या बँकेच्या शाखेत ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. परंतु मागील तीन दिवसांपासून बँकेची लिंक नसल्यामुळे व्यवहार ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांची तातडीची पैशाची कामेही अडली आहेत. पवनार येथील एका शेतकऱ्याला ट्रॅक्टर चालान केल्यामुळे न्यायालयात ७० हजार रुपये भरायचे होते. तो २१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बँकेत पैसे काढण्यासाठी गेला असता त्याला लिंक नसल्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. असे बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. माझी रक्कम तुमच्याच बँक शाखेत आहे. दुसरीकडे माझे खाते नाही, त्यामुळे मी वेळेवर पैसे कोठून आणावे, असे या ट्रॅक्टरमालक शेतकऱ्याने बँकेतील कर्मचाऱ्यांना विनवणी करीत सांगितले. पण बँक कर्मचारी शेतकऱ्याचे म्हणणे ऐकूण घेत नव्हते. शेतकऱ्याला बँकेच्या वर्धा शाखेतून रक्कम काढण्याची तजवीज करून देणे गरजेचे होते. पण तशी व्यवस्थाही येथील शाखेने करून दिली नाही. शेवटी त्या शेतकऱ्याला सोने गहाण ठेवून रक्कम भरावी लागली. एका विद्यार्थिनीला तिच्या नवीन अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्क भरण्यासही लिंक फेलमुळे पैसे मिळाले नाही. या शाखेत लिंक नसणे, ही नित्याचीच बाब झाली आहे. यामुळे महिन्यातील बरेच दिवस एटीएमही बंद राहाते. याबाबत विचारले असता कर्मचारी आम्ही काहीच करू शकत नाही लिंक आली म्हणजे आपोआप सुरू होईल असे सांगतात. इतकेच नाही तर या बँकशाखेत व्यवस्थापक, कॅशिअरसह फक्त चार कर्मचारी आहेत, कमी संख्येमुळे कामाच्या गतीवर विपरित परिणाम होतो. यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. ग्राहकांचे ताटकळत राहणे ही नित्याचीच बाब झाल्याने ग्राहकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. एवढ्या मोठ्या गावाचा कारभार चालवणाऱ्या बँकेत फक्त चार कर्मचारी आहे. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून दुसरी शाखा सुरू करण्याची मागणी करीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ग्राहकांची समस्या तत्काळ दूर करावी व मनस्ताप दूर करावा, अशी ग्राहकांची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)