शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बँकेने कर्जवसुलीला दिली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

आर्वीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी विकास शाखेने शेतकºयांवर थकीत असलेल्या कृषी कर्ज सक्तीने वसुल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यावर्षीच्या निसर्ग कोपामुळे कृषी कर्ज थकले आहे. गृहकर्ज, सोने तारण व ट्रॅक्टर इत्याची कर्जाचे नियमित हप्ते भरत असतानाही त्यांना कृषी कर्जाचे थकबाकीदार दाखवून सक्तीची वसुली केली जात आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा धसका : जगताप यांची सहायक व्यवस्थापकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने विलंबाने हजेरी लावली आणि आता परतीच्या पावसाने पाठ सोडली नाही. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असतानाही बँकेकडून सक्तीची कर्ज वसुली केली जात आहे. त्यामुळे प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी किटकनाशकच्या बॉटल घेऊन शेतकऱ्यांसह स्टेट बँकेच्या क्षेत्र सहाय्यक प्रबंधक कार्यालयात धडक दिली. या आंदोलनाचा धसका घेत प्रबंधक अनिल साटोने यांनी कर्जवसुलीला मुदत वाढ दिली.आर्वीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी विकास शाखेने शेतकऱ्यांवर थकीत असलेल्या कृषी कर्ज सक्तीने वसुल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यावर्षीच्या निसर्ग कोपामुळे कृषी कर्ज थकले आहे. गृहकर्ज, सोने तारण व ट्रॅक्टर इत्याची कर्जाचे नियमित हप्ते भरत असतानाही त्यांना कृषी कर्जाचे थकबाकीदार दाखवून सक्तीची वसुली केली जात आहे. बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांना बँकेडून वारंवार फोन करुन मालमत्ता लिलाव करुन कर्ज वसुली करण्याचीही दमदाटी केली जात असल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे.दुष्काळी परिस्थितीत बँक शेतकऱ्यांवर सक्ती करुन आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकºयांची ही समस्या लक्षात घेऊन प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी किटकनाशकच्या बॉटल घेऊन पदाधिकारी व शेतकºयांसह बँकेच्या कृषी विभागात धडक दिली. त्यामुळे बँकेत चांगलीच खळबळ उडाली होती. नागपूरचे क्षेत्र सहाय्यक प्रबंधक अनिल साटोने यांच्या पुढे शेतकऱ्यांची परिस्थिती मांडली. त्यांनीही परिस्थिती लक्षात घेऊन सक्तीची कर्ज वसुली थांबवत मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज