शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करा

By admin | Updated: July 12, 2015 02:25 IST

लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्यसेविका व सेवकाला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील चंगेरा येथे ८ जुलै रोजी घडली.

वर्धा : लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्यसेविका व सेवकाला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील चंगेरा येथे ८ जुलै रोजी घडली. यात आरोग्य सेविका साधना लांजेवार, कंत्राटी आरोग्य सेविका छाया गायकवाड व आरोग्य सेवक सूर्यभान नागदेवे हे थोडक्यात बचावले. त्यामुळे घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वर्धाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. चंगेरा येथे बुधवारी ८ जुलै रोजी लसीकरण होते. यावेळी साधना लांजेवार, छाया गायकवाड आणि सूर्यभान नागदेवे लसीकरणाचे काम करीत होते. चंगेरा येथील सायना जमीर मिर्झा या महिलेची प्रसूती गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथे मंगळवारी ७ जुलै रोजी झाली होती. बुधवारी तिच्या बाळाची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या नवजात बाळाला अतीदक्षता कक्षात ठेवण्यात आले होते. परंतु घरच्यांनी त्या बाळाचा उपचार न होवू देताच घरी नेले आणि ८ रोजी चंगेरा येथील अंगणवाडीत सुरू असलेले लसीकरणात नवजात शिशूलाही पोलिओ व बीसीजी लसीकरण दिले. बाळाची प्रकृती बरी नसतानाही सदर बाळाला घरी घेवून आल्याची बाब उपस्थित लसीकरणातील कर्मचाऱ्यांना कुटुंबातील लोकांनी सांगितली. या लसीकरण केंद्रात पोलिओ व बीसीजी लस तीन बालकांना देण्यात आले. सायना मिर्झा हिच्या बाळालाही लस देण्यात आली. परंतु प्रकृती खालावल्यामुळे बाळाला गंगाबाई स्त्री रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र घरच्यांनी गंगाबाई रुग्णालयात न नेता रजेगाव(मध्यप्रदेश) येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. ही बाब मृताच्या घरच्या लोकांना कळताच त्यांनी काही लोकांच्या मदतीने लसीकरण केंद्र सुरू असलेली अंगणवाडी गाठून उपस्थित असलेल्या तिनही आरोग्य कर्मचाऱ्यांना हातात मिळेल त्या वस्तूंने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना व्हॅक्सीनच्या डब्यांनी ते डबे फुटेस्तोवर मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे बेदम मारहाणीनंतर रॉकेल आणून सदर आरोग्यसेवकांना जाळून मारेकऱ्यांचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र वेळीच रावणवाडी पोलीस घटना स्थळी दाखल झाल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्या वतीने निशेष नोंदविण्यात आला. तसेच आरोपींना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पूर्णपणे संरक्षण मिळेल याची हमी शासनानी घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळात संघटनेच्या जिल्हा शाखा उपाध्यक्ष सुजाता कांबळे, संजय डफळे, सचिव दीपक कांबळे, रेवतकर, कन्हेर यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)