शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

ढगा जंगलात आढळले एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

खरांगणाचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून सदर एटीएम मशीन ताब्यात घेतली. शिवाय घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. एटीएम पळवून नेण्यात आल्याचा गुन्हा सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल असल्याने सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. बारकाईने पाहणी अंती सदर एटीएम मशीन सेवाग्राम परिसरातून पळवून नेण्यात आलेली नसल्याच्या निकषावर पोलीस पोहोचले.

ठळक मुद्देएटीएम मशीन कुठली, पोलीस तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कखरांगणा (मो.) : वर्धा शहराशेजारील सेवाग्राम येथील मेडिकल चौकातील एटीएम कक्षातून रोकड असलेली मशीन चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच ढगा जंगल परिसरात बेवारस स्थितीत एटीएम मशीन आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही एटीएम मशीन जंगलात फेकली असावी, असा कयास पोलिसांकडून लावला जात आहे.खरांगणा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या ढगा जंगल परिसरात एटीएम मशीन बेवारस स्थितीत पडून असल्याची माहिती काहींनी खरांगणा पोलिसांना दिली. त्यानंतर खरांगणाचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून सदर एटीएम मशीन ताब्यात घेतली. शिवाय घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. एटीएम पळवून नेण्यात आल्याचा गुन्हा सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल असल्याने सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. बारकाईने पाहणी अंती सदर एटीएम मशीन सेवाग्राम परिसरातून पळवून नेण्यात आलेली नसल्याच्या निकषावर पोलीस पोहोचले. वर्धा जिल्ह्याच्या शेजारील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आदी ठिकाणी एटीएम पळवून नेण्यात आल्याची घटना घडली काय याचीही शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे.मागील आठ ते दहा दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यातील दोन ठिकाणी तर वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून एटीएम मशीन पळवून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच ढगा जंगल परिसरात एटीएम आढळून आले आहे. सेवाग्रामसह एकूण तीन पोलीस ठाण्यात सदर मशीनबाबत विचारणा करण्यात आली आहे. परंतु, मशीन नेमकी कुठली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.- संजय गायकवाड, ठाणेदार, खरांगणा.

टॅग्स :atmएटीएम