शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

आष्टी तालुक्याचा निकाल ७४ टक्के

By admin | Updated: June 20, 2014 00:03 IST

माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाला नुकताच जाहीर करण्यात आला. यात तालुक्याचा एकूण निकाल ७४.८४ टक्के लागला आहे. हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी जान्हवी प्रवीण गोहाड

आष्टी(श.) : माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाला नुकताच जाहीर करण्यात आला. यात तालुक्याचा एकूण निकाल ७४.८४ टक्के लागला आहे. हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी जान्हवी प्रवीण गोहाड हिने ९४.४० टक्के गुण प्राप्त करीत तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. यासह यशस्वी निकालाची परंपरा हुतात्माने विद्यालयाने यावर्षीही कायम ठेवली आहे. तालुक्यातून द्वितीय अंजली सुरेश सोनोवणे ९३.६० टक्के, तृतीय कृतिका विनोद पेठे ९३.२० टक्के गुण मिळविले आहे.हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयातून एकूण १७० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यापैकी १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकूण निकाल ९४.१२ टक्के आहे. ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी मनिषा केशव गोहाड ९०.८० टक्के, मयुर लोखंडे ९१.२० टक्के, सुयश निकाळजे ९०.२० टक्के गुण प्राप्त केले आहे.लोकमान्य विद्यालयातून एकूण १९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकूण निकाल ८२.९० टक्के आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक अदिती केशव चौरेवार ९३ टक्के, द्वितीय मनीष शिंदे ९०.८० टक्के, तृतीय वैष्णवी घावट ९०.४० टक्के ठरले आहे. जवाहर उर्दु हायस्कूल येथून एकुण ४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकूण निकाल ९३.०२ टक्के आहे. विद्यालयातून प्रथम निदा तरन्नुम शादीक ८७ टक्के, द्वितीय महेश परवीन अकबरखान ८५ टक्के, तृतीय सिरीन परवीन शेख मुस्ताक ८४.३० टक्के गुण मिळाले आहे. मॉडेल हायस्कूल तळेगाव येथील १०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यापैकी ६९ उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकूण निकाल ६८.३१ टक्के, कानेश्वर विद्यामंदिर साहूर चा निकाल ५७.३५ टक्के, हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय साहुर ३९.४७ टक्के, मॉडेल हायस्कूल भारसवाडा ७३.९१ टक्के, संत भाकरे महाराज विद्यालय माणीकवाडा ७१.४२ टक्के, जवाहर स्मृती विद्यालय देलवाडी ७६.६६ टक्के, नुतन कन्या विद्यालय तळेगाव ६७.४४ टक्के, अंजनाबाई झाडे कन्या विद्यालय आष्टी ५९.३७ टक्के, शासकीय आश्रमशाळा पांढूर्णा ४७.३६ टक्के, शारदादेवी भार्गव विद्यालय ९४.७३ टक्के, संत गजानन महाराज विद्यालय लहान आर्वी ६६.६६ टक्के, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय अंतोरा ५६.२५ टक्के, स्व. दादासाहेब अडसड विद्यालय खडकी ८० टक्के, स्वातंत्र्यवीर लोहे विद्यालय वडाळा ६८.१८ टक्के निकाल आहे. या शाळांनी दहा वर्षातील निकालाची परंपरा यावर्षीही कायम आहे.कारंजा तालुक्याचा निकाल ७८.५३ टक्के कारंजा(घा.) : दहावीकरिता तालुक्यातुन एकूण १२४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एकूण ९८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात तालुक्याचा ७८.५३ टक्के निकाल लागला आहे. यात स्व. राजीव गांधी मेमोरीयल हायस्कूलने सलग चौथ्यांदा १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवीत यश संपादन केले. तर याच विद्यालयाच्या भावेश सरोदे याने तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. त्याने ५०० पैकी ४६४ गुण प्राप्त केले आहे. त्याचा संस्थेच्या संचालिका अरुणा चाफले मुख्याध्यापक व शिक्षकांनी सत्कार केला. तसेच अन्य उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.कारंजा तालुक्यातून एकुण २० शाळांमधून विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये मॉडेल हायस्कूलचा ७४.६२ टक्के निकाल लागला असुन भुषण बळीराम राउत याने ९०.८० टक्के गुण प्राप्त करुन शाळेतून प्रथम आला. प्रणाली सुधाकर ईखार हिने ९०.६८ टक्के गुण प्राप्त करुन व्दितीय क्रमांक पटकाविला तर सृष्टी प्रल्हाद खवशी हिने ८७.४० टक्के गुण मिळवून ती शाळेतून तिसरी आली. कारंजा येथील स्व.राजीव गांधी मेमोरियल हायस्कूलने या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. समृध्दी कामडी हिने ८४ टक्के गुण मिळवून शाळेतून व्दितीय आली. निखील ढोले ८२.७४ टक्के गुण मिळवुन तिसरा आला. येथील कस्तुरबा विद्यालयाचा ६७.५० टक्के निकाल लागला आहे. तुषार डोबले ८३ टक्के गुण घेवुन शाळेतून प्रथम आला. वैभव ढोबाळे ७६.२१ टक्के व्दितीय तर श्रध्दा गाखरे ७५.२१ टक्के गुण घेवुन तृतीय आली. नवप्रभात विद्यामंदिर ठाणेगांव शाळेचा निकाल ७४.३५ टक्के, दादासाहेब कन्नमवार विद्यालय ९१.८९ टक्के, पार्डी हायस्कूल चा निकाल ७९.४५ टक्के, माध्यमिक विद्यालय काजळी ८६.८४ टक्के, सोहमनाथ विद्यामंदिर उमरी ९३.९० टक्के, माध्यमिक विद्यालय चिंचोली ९५.४५ टक्के, महात्मा फुले विद्यालय सारवाडी ८५.३३ टक्के, अण्णासाहेब गुंडेवार विद्यालय नारा ७८.४३ टक्के, ग्रामविकास विद्यालय काकडा ९३.९४ टक्के, सावित्रीबाई फुले विद्यालय ८७.५० टक्के, इंदीरा कन्या विद्यालय कारंजा ४४.०७ टक्के, जगदंबा विद्यालय सावळी ८६.६७ टक्के, यशवंत विद्यामंदीर सेलगांव ८१.८२ टक्के, आठवले आदिवासी विकास हायस्कूल सिंदीविहिरी ८४.६२ टक्के, भाकरे महाराज हायस्कूल सुसुंद्रा ७३.३३ टक्के, शासकीय आश्रम शाळा सिंदीविहिरी ८९.२९ टक्के, स्व. यादवराव केचे आदिवासी आश्रम शाळा नारा ८० टक्के लागला.