शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुका विकास आराखडा तयार

By admin | Updated: July 1, 2015 02:42 IST

शासनाच्या योजना ग्रामीण भागाचा विकास साधणाऱ्या आहेत. यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

आष्टी (श.) : शासनाच्या योजना ग्रामीण भागाचा विकास साधणाऱ्या आहेत. यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. वर्षभरापासून यासाठी शासनदरबारी समस्यांचा पाठपुरावा सुरू आहे. याला यश आल्याचे सांगून आमदार अमर काळे यांनी आष्टी तालुक्याचा विकास आराखडा सादर केला. तालुका आढावा सभा येथे पार पडली. यावेळी आ. काळे यांनी विकास कामांसह समस्यांचा आढावा घेतला.बैठकीला नियोजन विकास समितीचे सदस्य अरुण बाजारे, जि.प. सदस्य निर्मला बिजवे, पं.स. सदस्य डॉ. प्रदीप राणे, मुजाहीद खॉ, काँग्रेस कार्यकर्ते रवींद्र गंजीवाले, साहेब खाँ पठाण, राजेंद्र भातकुलकर आदी उपस्थित होते. येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहासाठी शासनाने पाच कोटी रुपये मंजूर केले. इमारत बांधकामाचे टेंडर लवकरच प्रकाशित होईल व बांधकामही सुरू होईल. तळेगाव पोलीस ठाणे इमारत बांधकामासाठी एक कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहे. त्याच्याही निविदा प्रक्रिया त्वरित होईल. तालुकास्थानी आवश्यक न्यायालय सद्यस्थितीत किरायाच्या इमारतीत आहे. शासनाकडे न्यायालयाच्या इमारतीसाठी मागणी केली. ती अंतिम टप्प्यात असून मंजुरीची प्रतीक्षा आहे, असेही आ. काळे यांनी सांगितले. आष्टी व पेठअहमदपूर गावाला जोडणाऱ्या लेंडी नदीवरील पुलाचे बांधकाम, गौरखेडा वॉर्डातील पुरहानी करणाऱ्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, गोदावरी अ‍ॅप्रोज रोड, टेकोडा अ‍ॅप्रोज रोड बांधकाम जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित केले आहे. मंजुरी मिळताच विकास कामे सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार निधी अंतर्गत आवश्यक ठिकाणी रस्ते, पाण्याची सुविधा, विद्युत पुरवठा, सभागृह बांधकाम प्रस्तावित आहे. निधी अपुरा असल्याने कामे पूर्ण करण्यात अडथळा येत आहे. पॅकेज अंतर्गत तालुक्यात मंजूर सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले; पण वीज कंपनीने जोडणी दिली नाही. यामुळे शेतकरी पाणी असताना रबी व उन्हाळी पिके घेऊ शकत नाही. वीज कंपनीने त्वरित विद्युत जोडणी देण्याची मागणी वरिष्ठांकडे लावून धरणार आहे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनेक दिवसांपासून मानधनाची प्रतीक्षा असून ती समस्या सोडविली जाणार आहे. यासाठी तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्याचेही बैठकीत आ. काळे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)