शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत महिनाभर सिंचन होईल एवढेच पाणी!

By admin | Updated: December 9, 2015 02:28 IST

यंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने उघाड दिल्याने खरीप हंंगामातील पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागला.

पाण्याचा उपसा वाढला : उपविभागात ३५ टक्केच जलसाठा सुरेंद्र डाफ आर्वीयंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने उघाड दिल्याने खरीप हंंगामातील पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागला. यामुळे रबी हंगामात पिकांना पाण्याची मागणी दुप्पट झाल्याने पाण्याचा उपसा वाढला. आजच्या स्थितीत उपविभागातील जलसाठ्यात ३५ टक्के पाणी आहे. असलेले पाणी सिंचनाकरिता एक महिना पुरेल एवढेच पाणी असल्याची माहिती आहे. उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा अशी तीन तालुके आहेत. या तालुक्यात १७ लघुतलाव आहेत. आर्वीत सहा, कारंजा १० तर आष्टीत एक तलाव आहे. आर्वी तालुक्यात १५ पाझर तलाव, १३ गावतलाव आहे. या १३ गावतलावांपैकी सात हिवाळ्यातच कोरडे झाले आहेत. या सर्व तलावात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. आर्वी तालुक्यातील सालधरा, गोंडखैरी, काकडधरा, गौरखेडा, दहेगाव (गोंडी), पाचोड, तरोडा, किन्हाळा, चांदणी, पिंपळझरी, हुसेनपूर, पिंपळझरी खैरी, पांजरा बो. खानापूर, सालधरा, परसोडी, रामपूर, अजनगाव, पिंपळगाव (भोसले) आदी लघुतलावांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यात १३ पाझर तलाव पाच गाव तलाव व ३४ कोल्हापूरी बंधारे आहेत. आर्वी तालुक्यात २६ कोल्हापूरी बंधारे आहेत. त्यापैकी फक्त सात बंधाऱ्यात पाणी आहे, तदर कोरडे पडले आहे. आष्टी तालुक्यात एक दोन पाझर तलाव, पाच गाव तलाव व एक कोल्हापूरी बंधारा आहे. आर्वीत गत वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने लघुतलाव शंभर टक्के भरले होते. यावर्षी मात्र येथील जलायशये ५० टक्केही भरले नाही. फक्त एक महिना पुरेल एवढाच जलसाठा येथे असल्याची माहिती आहे. यावर्षीच्या अल्प पावसाचा खरीप व रब्बी हंगामातील पिकांना फटका व ताण सहन करावा लागला. यात रब्बी हंगामात जमिनीतील ओलाव्याअभावी पाण्याचा उपसा दुप्पट वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची मागणी दुप्पट झाली. रब्बीच्या पिकांना या उपविभागातून जानेवारी महिन्यापर्यंत पाणी पुरवठा केल्या जातो; परंतु यावर्षी रब्बी हंगाम उलटून एक महिलाच झाला आहे. अशात या जलसाठ्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाण्याअभावी रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत. ऐन हिवाळ्यातच येथील जलसाठे कोरडे पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तलाव कोरडे पडल्याने अनेक उपविभागात पाणी टंचाईचे निर्माण झाले आहे.