शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बाजारपेठेत साखरगाठ्यांचे आगमन

By admin | Updated: March 4, 2015 02:11 IST

शिशिर ऋतुचा उत्तरार्ध होतो तो होलिकात्सवाने. यानंतर चाहुल लागते

होळीच्या सणाची चाहुल : गाठ्यांवरही महागाईचे सावट; ८० रुपये किलोचा दरवर्धा : शिशिर ऋतुचा उत्तरार्ध होतो तो होलिकात्सवाने. यानंतर चाहुल लागते वसंतागमनाची. निसर्गही या काळात आपले रूप पालटतो. होळी हा जसा रंगांचा सण मानला जातो तसाच गोधधोड पदार्थांचीही याकाळात रेलचेल असते. या सणाला घरातील लहानग्यांना गाठी देण्याची परंपरा आजतागत कायम आहे. शहरातील बाजारपेठेतही साखरगाठ्यांनी दुकाने सजलेली पहायला मिळत आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साखरगाठ्यांच्या किंमतीत काही प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येते. गत वर्षी गाठ्यांचा दर ८० ते १५० रुपयांपर्यंत होते. यंदा मात्र तेच दर ६० ते ८० रुपयांपर्यंत आहे. यामुळे महागाईच्या धबडग्यात सर्वसामान्यांना ही बाब दिलासा देणारी ठरणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होळी व धुलिवंदन आहे. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठतेही आवश्यक वस्तुंची आवक सुरू झाली आहे. शुभ्र रंगासह विविध रंगातील गाठ्या दुकानांमध्ये विक्रीकरिता उपलब्ध आहे. शिवाय पिचकारी, गुलाल यांनी तर बाजारपेठही खुलून गेली आहेत. ग्रामीण भागातूनही लोक शहारात गाठ्या खरेदी करण्याकरिता येत आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठेत होळी व धूलिवंदनानिमित्त गाठीची ठिकठिकाणी दुकाने थाटलेली दिसतात. यातच भाव कमी असल्याने यंदा गाठ्यांची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी होईल, अशी माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली. सध्या गाठ्यांच्या दुकानात गर्दी होत असल्याचे चित्र आहे.(स्थानिक प्रतिनिधी)विविध आकारातील व रंगातील गाठ्या ठरताहेत ग्राहकांचे आकर्षण होळी सणाच्या आठ दिवसांपूर्वी पासूनच बाजारात गाठीचे दुकाने सजली आहेत. विशेष म्हणजे साधारण गाठ्यांसह वेगवेगळया आकारातील गाठ्या ग्राहकांना आकर्षित करताना दिसतात. बाजारात सध्या लहान आकारातील तसेच मोठे पदक असलेल्या गाठ्या अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. यातील साधारण व लहान ठपक्यांच्या गाठ्या ८० रुपये प्रति किलो दराने तर मोठ्या पदकांच्या गाठ्या १२० व ७० रुपये दराने विकल्या जात आहेत.गाठ्यांचे नवे रूपगाठ्या ग्राहकांच्या पसंतीस याव्यात यासाठी दरवर्षी त्यांच्या आकारात बदल केले जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. साध्या रूपात रंगीबिरंगी व विविध कलाकृती केलेल्या गाठ्यांची गर्दी बाजारात दिसून येत आहे.