शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:09 IST

तालुक्यातील बांगडापूर, सिंदीविहीर, मरकसूर, अंभोरा, नांदोरा, रहाटी, उमरविहीरी, नागझरी, आजनडोह ही जंगलव्याप्त भागातील गावे असून येथे एक दिवसाआड वाघाचे दर्शन होत आहे. वाघाने येथील शेतशिवारात चांगलाच धुमाकूळ घातला असून महिन्याभरात २० च्यावर जनावरे फस्त केली आहे.

ठळक मुद्देसावळी (खुर्द) व आगरगाववासीयांची प्रशासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यातील सावळी (खुर्द) व आगरगाव परिसरात वाघाने चांगलीच दहशत माजविली आहे. आतापर्यंत २० जनावरांसह एका गोपालकाच्या नरडीचा घोट घेतल्याने गावकरी आता आक्र मक झाले आहे. मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यासोबतच वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनानंतर अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करुन ग्रामस्थांना आश्वासन दिले.पण, आश्वासन नाही कृती करा या मागणीवर नागरिक ठाम आहेत.सावळी (खुर्द) व आगरगाव ही दोन्ही गावे जंगलाला लागून असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांसह वाघाचाही त्रास वाढला आहे. तालुक्यातील बांगडापूर, सिंदीविहीर, मरकसूर, अंभोरा, नांदोरा, रहाटी, उमरविहीरी, नागझरी, आजनडोह ही जंगलव्याप्त भागातील गावे असून येथे एक दिवसाआड वाघाचे दर्शन होत आहे. वाघाने येथील शेतशिवारात चांगलाच धुमाकूळ घातला असून महिन्याभरात २० च्यावर जनावरे फस्त केली आहे. त्यामुळे गोपालकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. पण, वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने एका गोपालकालाही वाघाने ठार केले. त्यामुळे गावकºयांच्या संतापाचा भडका उडाला. वाघाच्या दहशतीत जगायचे कसे, शेतशिवारातील पिकांची राखन करायची कशी, असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने गावकरी एकवटले. त्यांनी प्रशासनाला निवेदन देत तत्काळ वाघाचा बंदोबस्त करण्यासोबतच मृताच्या परिवाराला आर्थिक मदत आणि घरातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे कारंजाचे तहसीलदार सचिन कुमावत, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर, पोलीस उपनिरीक्षक मोहन धुळे यांच्यासह महावितरणच्या अधिकाºयांनी गावात जाऊन नागरिकांची बैठक घेतली. मृताच्या परिवाराला आर्थिक मदत आणि नोकरीसंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तसेच वाघाचा बंदोबस्त लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पण, नागरिकांनी आश्वासन नाही तर वाघाचा बंदोबस्त करा, असा आग्रह धरल्याने वाघाच्या बंदोबस्ताकरिता शोधमोहीम राबविली जात आहे. वाघाला शोधण्याकरिता आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत गावकरीही जगलात फिरत आहे. परंतु वाघाचा थांगपत्ता लागला नाही.

टॅग्स :Tigerवाघ