शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकरी उतरले रस्त्यावर

By admin | Updated: June 6, 2017 01:08 IST

शेतकरी संपात सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद असला तरी जिल्ह्यात आज ठिकठिकाणी आंदोलने करून शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

शेतकऱ्यांसह विविध संघटनांकडून जिल्हाभर आंदोलन : बंदला वर्धेत संमिश्र प्रतिसाद; बाजार सुरूच लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी संपात सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद असला तरी जिल्ह्यात आज ठिकठिकाणी आंदोलने करून शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. पोहणा, जाम, केळझर व वायगाव (निपाणी) तर सायंकाळी पवनार येथे रस्ता रोको आंदोलन केले. दरम्यान देवळी येथे शिवसेनेच्यावतीने शेतकरी संपाना पाठींबा दर्शविणारे निवेदन तहसीलदारांना सादर केले. तर सिंदी (रेल्वे) येथे मूक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना सादर केले. किसान अधिकार अभियानच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.आश्वासनावर शेतकरी संप संपल्याची चर्चा सुरू असताना शेतकऱ्यांकडून मागणी पूर्ण होईस्तोवर आंदोलन सुरूच राहील असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. आज राज्यात बंद पुकारण्यात आला होता. यात वर्धेतील शिवाजी चौक परिसरात भूमिपूत्र शेतकरी संघटना, प्रहार व युवा सोशन फोरमच्यावतीने शासनविरोधी घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी गांधीगिरी करीत रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना फूल देत शेतकरी संपाला पाठींबा देण्याची विनंती केली. यावेळी प्रशांत देशमुख, सचिन घोडे, सुधीर पांगुळ, स्वप्नील देशमुख, कैलाश घोडे, अतुल पालेकर, प्रवीण काटकर, रितेश घोंगरे यांची उपस्थिती होती. पवनार येथे सायंकाळी शिवसेनेच्यावतीने रस्ता रोको करण्यात आला. यावेळी रस्त्यावर भाजीपाला व दूध टाकून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी नागपूर मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोहणा येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी टायर जाळून रस्ता रोको केला. या आंदोलनात माजी आमदार राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, संचालक विनोद वानखेडे, माजी पं.स. सदस्य दिवाकर वानखेडे, उपसरपंच राहूल वानखेडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. केळझर येथे शासनविरोधी घोषणा देत वर्धा-नागपूर महामार्ग रोखून धरला. यामुळे दोन्ही बाजुला चार ते पाच किलोमिटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यादरम्यान किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मिलींद हिवलेकर, डॉ. इर्शाद शेख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सिंदी (रेल्वे) व सेलू पोलिसांनी घटनास्थळी येवून परिस्थिती हाताळली.समुद्रपूर तालुक्यातील जाम चौरस्ता येथे चक्काजाम करीत रस्त्यावर दूध व भाजीपाला टाकून शासनाचा निषेध केला. येथील कृषी केंद्रचालकांनी त्यांनी दुकाने स्वयस्फूर्तीने बंद ठेवली होती. जाम येथे स्वराज इंडिया पार्टीचे प्रा. ज्ञानेश्वर वाकूडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यामध्ये लोकजन शक्ती पार्टी, बहुजन समाज पार्टी, लोकसाहित्य परिषद, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादी पक्षाचा सहभाग होता. या बंदमुळे तारसभर वाहतूक खोळबली होती. ठाणेदार प्रवीण मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अजय अवचट, उमेश हरणखेडे, चेतन मराठे यांनी कार्यकर्त्याना स्थानबद्ध करून सोडले. वायगाव (निपाणी) येथे शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या संपाला पाठींबा देण्यासाठी वायगाव चौफुली येथे सरोज काशीकर यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा आघाडीचे अध्यक्ष सतीश दाणी, माजी जिल्हा प्रमुख सुभाष बोकडे, पांडुरंग भालशंकर, दत्ता राऊत, धोंडबाजी गावंडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत ठाकूर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवळीत शिवसेनेने शेतकऱ्यांच्या संपाला पाठींबा देत बंदचे आवाहन केले. त्यानुसार व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवदेन तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना सादर केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनंत देशमुख, तालुका प्रमुख महेश जोशी, निलेश मोटघरे, प्रवीण कात्रे, अतुल अंबरकर, सुशील उमरे व पदाधिकाऱ्यांनी दिला.