शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडाअभावी रखडले घरकुलांचे वाटप

By admin | Updated: December 21, 2014 23:03 IST

प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाच्यावतीने घरकूल योजना राबविण्यात येत आहे. वर्धेत मात्र सन २०१४ मध्ये देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात लाभार्थी व योजनेचा

१,८४७ पैकी १,१३६ घरकूल मंजूर : लाभार्थ्यांची यादी वाढीवरच; मात्र जागेच्या अटीमुळे अडचण रूपेश खैरी - वर्धाप्रत्येकाला हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाच्यावतीने घरकूल योजना राबविण्यात येत आहे. वर्धेत मात्र सन २०१४ मध्ये देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात लाभार्थी व योजनेचा निधी असताना केवळ बांधकामाकरिता भुखंड नसल्याच्या कारणाने अनेकांना घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात या वर्षात इंदिरा आवास योजनेत १ हजार ८४७ घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यानुसार जिल्हा परिषदेच्यावतीने योग्य लाभार्थ्यांचा शोध घेत त्यांना घरकूल देण्याची प्रक्रिया सुरू झाली. जि.प.च्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजवंतांना घरकूल देण्यात आले. या योजनेत कार्यालयात दाखल झालेल्या अर्जानुसार एकूण १ हजार १३६ गरजवंतांना घरकूल मिळाले. योग्य लाभार्थ्यांना घरकुलाचे वितरण झाल्यानंतरही ७११ घरकुल शिल्लक राहत आहेत. ते घरकूल गरज असलेल्या जिल्ह्यांना देण्याबाबत जिल्हा परिषदेच्यावतीने वरिष्ठांपर्यंत पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. जिल्ह्यात योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी मिळत नाही असेही नाही. ज्यांनी अर्ज सादर केला त्यांच्या नावाने गावात जागा नसल्याने या योजनेचा लाभ त्यांना देणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शिल्लक असलेले घरकूल परत जाण्याच्या मार्गावर आहेत. यावर मार्ग काढण्याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने काही उपाय करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. घरकुलाचा लाभ देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळवून गावठाणावर जागा विकत घेत घरकुल देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आहे. तसा प्रस्तावही राज्याच्या सचिवालयातून केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर विचारमंथनही सुरू असल्याची माहिती आहे. जागेकरिता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदानाचे प्रयत्न वर्धा जिल्ह्यात जागा नसल्याच्या कारणाने घरकुल बांधकाम रखडले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. घरकुल बांधकामाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान घेत लाभार्थ्यांना गावठाणावर उपलब्ध असलेली जागा विकत घेऊन घरकुल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी दिली. इतर मागासवर्गीयांची प्रतीक्षा यादी मोठी घरकुल योजनेचा लाभ घेण्याकरिता असलेली इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी मोठी आहे. यात जागा नसल्याच्या कारणामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणे शक्य नाही. तर अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांनाही गरज असताना जागा नसल्याच्या कारणाने घरकुल मिळणे कठीण झाले आहे. यात शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर होण्याकडे साऱ्याच लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.