शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेमुळे ‘हवाई सफर’चे स्वप्न पूर्ण

By admin | Updated: June 24, 2016 02:28 IST

विमान आकाशातून जाताना त्याकडे कुतुहलाने बघायचो. आपल्याला विमानात बसण्याची संधी केव्हा मिळेल,

मलय लोकरे : हवाई सफरबाबत त्याच्या मित्रांमध्येही कमालीचे कुतुहलवर्धा : विमान आकाशातून जाताना त्याकडे कुतुहलाने बघायचो. आपल्याला विमानात बसण्याची संधी केव्हा मिळेल, असे मनोमन वाटायचे. परंतु, इतक्या लवकर ही संधी येईल, याचा जराही विचार केला नव्हता. लोकमत संस्काराच्या मोती स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात मला हवाई सफरची संधी चालून आली. आकाशाकडे बघून आकाशात झेप घेण्याचे बघितलेले स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला, ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया हवाई सफरचा विजेता मलय विजय लोकरे या विद्यार्थ्याची.मलय हा मसाळा येथील अग्रगामी स्कूलचा इयत्ता चवथीचा विद्यार्थी आहे. मलय शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजता नागपूर येथील विमानतळावरुन विमानाने दिल्लीला जाणार आहे. यासाठी तो गुरुवारी सायंकाळीच नागपूरला रवाना झाला. याप्रसंगी त्याला लोकमत परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी अग्रगामी स्कूलच्या प्राचार्य विद्या, उपप्राचार्य अशिर्ता, मलयची आई अंजली लोकरे उपस्थित होते. प्राचार्य विद्या यांनी मलय हा हुशार विद्यार्थी असल्याचे सांगितले.लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेमुळे त्याला हवाई सफर करता येणार याबद्दल आनंद व्यक्त करीत मलयला शुभेच्छा दिल्या.मलय म्हणाला, मी खूप एक्साईट आहे. विमानात केव्हा बसतो, असे झाले आहे. पहिल्यांदाच मी विमानात बसणार आहे. माझ्या मित्रांना पण माझ्या विमान प्रवासाबद्दल कुतुहल आहे. मी त्यांना सांगितले. लोकमतने घेतलेल्या संस्काराच्या मोती स्पर्धेमुळे मला विमानात बसण्याची संधी मिळत आहे. तेव्हा माझ्या मित्रांनीही या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा बोलून दाखविल्याचे तो म्हणाला. या स्पर्धेत यापुढेही नियमित सहभागी होत राहणार, असा निर्धारही मलयने बोलून दाखविला. मलयची आई अंजली लोकरे या अग्रगामी स्कूलमध्येच शिक्षिका आहे. वडिल उन्नती मोटर्समध्ये टीम लीडर म्हणून कर्तव्य बजावतात. त्यांनी सुद्धा मलय हा हवाई सफरबाबत खूप उत्साही असल्याचे सांगितले.(उपक्रम प्रतिनिधी)हवाई सफरसाठी निवड झाल्यापासून मलय कमालीचा उत्साहीमलयने २०१५ मध्ये लोकमततर्फे घेण्यात आलेल्या संस्काराच्या मोती स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये तो हवाई सफरचा विजेता ठरला. ही बाब त्याला माहित होताच त्याचा आनंद ओसंडून वाहत आहे. आणि तेव्हापासून तो हवाई सफर कशी राहील. विमानात बसल्यानंतर कसे वाटणार, विमान आकाशात उडल्यानंतर खाली बघितल्यानंतर कसे दिसणार, विमानाने दिल्लीला गेल्यानंतर किती मज्जा येईल. दिल्लीत कुणाला भेटणार, काय काय बघणार, असे असंख्य प्रश्न त्याच्या डोक्यात रुंझी घालत असल्याची प्रतिक्रिया मलयची आई अंजली लोकरे यांनी दिली.