शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

एड्स सप्ताहांतर्गत जनजागृती रॅली

By admin | Updated: December 6, 2015 02:15 IST

जागतिक एड्स सप्ताहांतर्गत नागरी आरोग्य केंद्र सिंदी मेघे, सामुदायिक स्वास्थ विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने ...

वर्धा : जागतिक एड्स सप्ताहांतर्गत नागरी आरोग्य केंद्र सिंदी मेघे, सामुदायिक स्वास्थ विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी आरोग्य केंद्र वर्धा येथून एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात कस्तुरबा आरोग्य मंडळाचे सचिव डॉ.बी.एस. गर्ग व सरपंच सुषमा येसनकर यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. रॅली सिंंदी (मेघे), हिंदनगर, बहुजन नगर, शांतीनगर, थुल ले-आऊट या परिसरातून काढण्यात आली. रॅलीत रमाबाई विद्यालय, जगजीवनराम विद्यालय व चेतना नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा, विहानच्या कार्यकर्त्या रोठा व्हायरस प्रोजेक्टचे कार्यकर्ते, नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी, लेप्रसी फाउंडेशन आणि आय.सी.एम.आर. प्रकल्पाचे कार्यकर्ते उपस्थित होते.नवं बाळ असावं, एड्स मुक्त असावं अशा प्रकारच्या घोषणा देत रॅलीची सांगता नागरी आरोग्य केंद्र, सिंदी (मेघे) येथे करण्यात आली. डॉ. गर्ग यांनी रॅलीला मार्गदर्शन केले. बहुलेकर यांनी एचआयव्ही एड्स कसा पसरतो, तो न पसरण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन अलका खेडकर यांनी केले. यशस्वीतेकरिता विद्या शेंडे, अलका खेडकर, निलेश चिके, अंजली बारई, गजानन कुऱ्हाडकर आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)