शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अवैध टॉवर्सच्या विरोधात आंदोलन सुरूच

By admin | Updated: December 24, 2014 23:04 IST

रहिवाशांच्या घराच्या आवारात एका कंपनीने अनधिकृतपणे उभारलेल्या टॉवरच्या विरोधात मागील १७ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही.

वर्धा : रहिवाशांच्या घराच्या आवारात एका कंपनीने अनधिकृतपणे उभारलेल्या टॉवरच्या विरोधात मागील १७ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे अद्यापही आंदोलन सुरूच आहे. बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक तीनमधील तुरके आणि वॉर्ड क्रमांक पाचमधील रामभाऊ मुडे यांच्या घरी रिलायंन्स कंपनीने अवैधरित्या हे टॉवर उभारले आहेत़ त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची झळ पोहोचलेल्या नागरिकांनी वारंवार तक्रारी करून हे दोन्ही टॉवर हटविण्याची मागणी लावून धरली होती़ तसेच ग्रामसभेत टॉवर काढण्याबाबत एकमताने ठराव मंजूर केला आहे़ परंतु, सरपंच योगिता देवढे या टॉवर काढण्यास टाळाटाळ करीत आहेत़ याबाबत गटविकास अधिकारी यांनी लेखी अर्जसुद्धा दिला़ त्यांनी चौकशी केली असता लिपिक मिलिंद मून व बजरंग नरड दोषी असल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, असे कळविले़ मात्र सरपंच व सचिव कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे़ रहिवाशांनी मंगळवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरूवात केली़ उपोषणादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी सरपंच ,सदस्य व कंपनीचे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला़ होता. काही मार्ग न काढल्यामुळे उपोषण सुरूच आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाने सभा घेऊन टॉवरला सील लावले़ असे सांगून आमची दिशाभूल केल्याचा आरोप उपोअषणकर्त्यांनी केला आहे. जोपर्यंत टॉवर काढणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार तसेच उपोषणाकर्त्यांच्या जीवितास धोका झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.(शहर प्रतिनिधी)