शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: March 11, 2015 01:43 IST

जिल्ह्यात गत आवड्यात आलेल्या वादळी पावसाच्या खुना सुकते न सुकते सोमवारी रात्री पुन्हा जिल्ह्यातील काही भागात वादळा पावसाने कहर केला.

कारंजा(घाडगे), देवळी : जिल्ह्यात गत आवड्यात आलेल्या वादळी पावसाच्या खुना सुकते न सुकते सोमवारी रात्री पुन्हा जिल्ह्यातील काही भागात वादळा पावसाने कहर केला. यात कारंजा व देवळी तालुक्यातील काही भागात आलेल्या या वादळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी पावसासह गारपीट झाल्याने चना, गहू या पिकांसह संत्रा उत्पाकांचा पट्टा असलेल्या या भागात संत्र्याचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरात आलेल्या वादळी पावसामुळे भिडी नजीक झाड कोसळल्याने यवतमाळ-वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा हे झाड तोडल्याने वाहतूक सुरळीत झाली. तर कारंजा येथे शेतात असलेल्या कृषी पंपाच्या पेटीवर वीज कोसळल्याने पेटी जळून खाक झाली. यात शेतकऱ्याचे नुकसान झाले. कारंजा तालुक्यातील धर्ती, भालु, बोरी, सोनेगांव, ठाणेगांव या गावांना वादळी वारा व गारपीटीने झोडपले. सर्वाधिक गारपीट धर्ती येथे झाले. सुमारे एक तासभर सुरू असलेल्या या गारपीटीने व मुसळधार पावसाने गहु, चना, संत्रा, व भाजीपाला पिकांचे नुकसान केले. यावेळी झालेल्या गारपीटीत गारांचा मारा इतका जबर होता की अनेकांना घरातील सज्जाचा आश्रय घ्यावा लागला. गारा फावड्याने गोळा कराव्या लागल्या. येथील शेतकरी प्रदीप हिंगवे यांच्या शेतातील संत्र्यासह १० एकरातील चणा एैन संवंगणीच्या वेळी गारपीटीने उद्ध्वस्त झाल. यात त्यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना याचा फटका बसला. सदर नुकसानीचा प्राथमिक सर्व्हे येथील तलाठी लताड व कृषी सहाय्यक अरुण कुटे यांनी केला. धर्ती येथील सरपंच अनुसया मानमोडे, उपसरपंच व सदस्यांनी विशेष सभा बोलावत सचिव अर्चना धारपुरे यांनी नुकसानीबाबत ठराव घेवुन गावातील १०० शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची पाठ निसर्ग सोडतांना दिसत नाही. अतिवृष्टी कधी दुष्काळ अशा एक ना अनेक आसमानी संकटाला समोर जात असलेल्या शेतकऱ्यांना आता गारपीटीने झालेले नुकसान मिळणार नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तसा शासनाचा आदेश असल्याचे सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी/प्रतिनिधी)