शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा महिलाच बसणार

By admin | Updated: July 12, 2014 01:39 IST

सदस्य संख्या २३ असलेल्या आर्वी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार असल्याने नवीन नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

सुरेंद्र डाफ आर्वीसदस्य संख्या २३ असलेल्या आर्वी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार असल्याने नवीन नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. आर्वी न.प.च्या नवीन नगराध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा महिलाच विराजमान होणार आहे. पुढील अडीच वर्षासाठी नवीन नगराध्यक्षपद हे खुला प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. यामुळे इच्छूक महिला सदस्य नगराध्यक्षपद आपल्याला मिळावे यासाठी फिल्डींग लावून आहे.आर्वी नगर परिषदेत सध्या भाजपाकडे बहुमत आहे. भाजपाचे १३ व एक स्वीकृत सदस्य, काँग्रेसकडे नऊ व एक स्वीकृत असे संख्याबळ आहे. यात काँग्रेसकडे सहा महिला तर भाजपात पाच सदस्य आहे. यात बहुमत भाजपाकडे असल्याने या पक्षाच्या महिला सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काँगे्रस पक्षाच्यावतीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राहणार आहे. यात काही घडामोडी झाल्यास सत्ताधारी पक्षाच्यावतीने पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवीन चेहरा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात विद्यमान लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गत अडीच वर्षांचा नगराध्यक्षाचा कार्यकाळ हा अधिक वादग्रस्त ठरल्याचा ठपका जनमाणसात आहे.भाजपाच्या नगरसेवकात विकास धोरणाबाबत नगराध्यक्षासोबत एकवाक्यता नसल्याने नगराध्यक्षकांनी ‘एकला चलो रे’ भूमिका ठेवत आपला कार्यभार सांभाळला. अडीच वर्षात आर्वी शहराचा विकास रखडला. काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येऊन विद्यमान नगराध्यक्ष भाजपाच्या निकटवर्तीय झाल्या; परंतु यातही विकासाबाबत समन्वय दिसून आला नाही. पालिकेच्या अर्थसंकल्पात आर्वीतील अनामिका बगीचा, स्वामीसमर्थ उद्यान सौंदर्यीकरणसाठी १० लाखांची तरतुद असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. अनेकांना पदाचे डोहाळे लागले असले तरी नव्या नगराध्यक्ष कोण होईल, याकडे आर्वीकरांचे लक्ष लागून आहे.