शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतरही गोहदा ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा

By admin | Updated: May 27, 2015 01:58 IST

हिंगणी येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोहदा गावात आजवर बस पोहोचलीच नाही.

बोरधरण : हिंगणी येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोहदा गावात आजवर बस पोहोचलीच नाही. स्वातंत्र्यानंतरही गावातील नागरिक या सुविधेपासून वंचित आहे. वारंवार मागणी करूनही उपयोग होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यशीलतेवर संताप व्यक्त केल्या जात आहे. येथील ग्रामस्थांची प्रवासाकरिता होणारी पायपीट आजतागायत कायम आहे.गोहदावासियांची बसफेरीची प्रतीक्षाच कायम असली तरी प्रशासकीय स्तरावर अद्याप कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. शिवाय लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार करूनही बस आजवर गावात आली नसल्याने गावकरी संताप व्यक्त करतात. निवडणूक काळात मत मागण्यासाठी आलेले उमेदवार बसफेरी चालु करून देऊ, असे आश्वासन देतात. मात्र निवडणूक आटोपल्यावर याचा विसर पडतो. असा आजवरचा गोहदावासियांचा अनुभव आहे. गोहदा गावाची लोकसंख्या ४०० च्या घरात आहे. येथील ग्रामस्थांना कामाकरिता तसेच आठवडी बाजाराकरिता हिंगणी येथे जावे लागते. मात्र बस नसल्याने पायी किंवा खासगी वाहनाने जावे लागते. आठवडी बाजाराच्या दिवशी खासगी वाहने सुरू असतात. परंतु अन्य दिवस सायकल किंवा खासगी वाहनांखेरीज पर्याय नसतो.विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर पायपीट करावी लागते. यात विद्यार्थ्यांची कसरतच होते. हिंगणी येथे इयत्ता ५ ते १० वी पर्यंत शाळा आहे. शिक्षणासाठी तेथेच जावे लागते. अशात शाळेला उशीर झाल्यास शिक्षक दंड करतात. घरी जाताना काळोख पडण्यापूर्वी जावे लागते. पायपीट करण्यातच विद्यार्थी थकतात. यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पालक सांगतात. लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे लक्ष देत गावकऱ्यांची समस्या त्वरीत सोडवावी अशी मागणी होत आहे. परिवहन विभागाने दखल घेण्याची मागणी आहे.