शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर संविधान स्तंभाची दुरूस्ती

By admin | Updated: November 26, 2015 02:08 IST

गत काही महिन्यांपासून दुरवस्थेत असलेल्या स्तंभाच्या दुरूस्तीचा मुहूर्त पंचायत समितीला अखेर सापडला. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबरला या स्तंभाची दुरुस्ती करण्यात आली.

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला डागडुजीविजय माहुरे सेलूगत काही महिन्यांपासून दुरवस्थेत असलेल्या स्तंभाच्या दुरूस्तीचा मुहूर्त पंचायत समितीला अखेर सापडला. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबरला या स्तंभाची दुरुस्ती करण्यात आली. नेमका संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला ही दुरुस्ती करण्यात आल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत होते. तसेच ‘लोकमत’ने वारंवार केलेल्या पाठपुराव्यालाही यश मिळाल्याचे बोलल्या जात होते. सेलू येथील पंचायत समिती आवारातील संविधान स्तंभाची अत्यंत दुरवस्था झाली होती. या संदर्भात ‘लोकमत’ने अनेकवार येथील संविधान स्तंभाच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रकाशित केले होते. मंगळवारी पंचायत समितीची मासिक सभा झाली. या सभेत पंचायत समिती सदस्य संजय जयस्वाल व रजनी तेलरांधे यांनी लोकमतमध्ये संविधान स्तंभाच्या दुरावस्थेचे वृत्त प्रकाशित झाले असतानाही आपण त्या स्तंभाची दुरूस्ती केली नाही. गुरूवारी २६ रोजी संविधान दिन आहे. त्यामुळे आपण हा दिवस कसा साजरा करणार, असा मुद्दा उपस्थित करीत एक दिवसात डागडुजी करावी, अशी मागणी केली.याची दखल घेत बुधवारी २५ ला सकाळपासूनच स्तंभाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. तात्पुरता का होईना पण स्तंभाची दुरूस्ती झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत होते. किरकोळ खर्चासाठी पंचायत समितीला सहा महिन्याहून अधिक काळ का लागला हे न उलगडणारे कोडे असून या स्तंभाच्या दुरूस्तीसाठी एका दिवसातच निधी कसा उपलब्ध झाला, स्तंभाच्या दुरूस्तीसाठी किती खर्च झाला, हे बांधकाम विभागाकडूनच माहिती होणार आहे. याकडेही ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.हा स्तंभ गटविकास अधिकारी कार्यालयापुढे असतानाही दुर्लक्षित झाला होता. स्तंभाच्या दुरूस्तीसाठी अखेर पंचायत समिती सदस्यालाच आवाज उठवावा लागल्याची चर्चा पंचायत समिती आवारात होती.लोकमतच्या वृत्ताची अखेर दखलसेलू येथील पंचायत समिती आवारातील संविधान स्तंभाची झालेली दुरवस्था हा येथील नागरिकांसाठी नेहमीच चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय होता. त्यामुळे ‘लोकमत’ने या स्तंभाची दुरुस्ती व्हावी यासाठी वारंवार वृत्त प्रसिद्ध केले. अखेर संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला या स्तंभाच्या दुरुस्तीचा मुहूर्त मिळाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत होते. किरकोळ खर्चासाठी सहा महिन्यांचा अवधीकिरकोळ खर्चासाठी पंचायत समितीला सहा महिन्यांहून अधिक काळ का लागला हे न उलगडणारे कोडे आहे. या स्तंभाच्या दुरूस्तीसाठी एका दिवसातच निधी कसा उपलब्ध झाला तसेच या स्तंभाच्या दुरूस्तीसाठी किती खर्च झाला, हे बांधकाम विभागाकडूनच माहिती होणार आहे. त्याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.