शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

आराध्य कोंडावार जिल्ह्यातून प्रथम

By admin | Updated: June 4, 2017 00:57 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल शनिवारी जाहीर झाला.

सीबीएसई दहावीचा निकाल लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल शनिवारी जाहीर झाला. यात हिंगणघाट येथील गिरधरदास मोहता भवन्स विद्यालयाचा आराध्य कोंडावार हा जिल्ह्यातून प्रथम आला. त्याने ९९.२ टक्के गुण घेतल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली. त्याला ४९६ गुण मिळाले. तर भुगाव येथील लॉयड्स विद्यानिकेतच्या वेदांत राठी हा ९८ टक्के गुण घेत द्वितीय आला. त्याला ४९० गुण मिळाल्याची माहिती शाळेने दिली. केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात आली. यातील चैन्नई विभागाचा निकाल आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. मानव संसाधन विकास मंत्रालयद्वारा संचालित जिल्ह्यात एकूण १४ शाळा आहेत. या शाळांतून परीक्षा देणाऱ्या १३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती शाळांतून देण्यात आली. तर पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातील केंद्रीय विद्यालयाचा निकाल ९८.०५ टक्के लागला. दहाव्या वर्गाच्या या परीक्षेत सीजीपीए ग्रेड पद्धत असल्याने बऱ्याच शाळांचा त्यांच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढणे कठीण झाल्याचे दिसून आले. यामुळे सायंकाळपर्यंत काही शाळांची निकाल काढण्याची घावपळ सुरूच होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉर्इंट म्हणून या परीक्षेची ओळख आहे. येथूनच विद्यार्थी त्याच्या पुढच्या शैक्षणिक भविष्याचा निर्णय घेत असतो. यामुळे या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे लक्ष होते. शनिवारी अखेर हा निकाल जाहीर झाला.या निकालात सर्वच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यातील या अभ्यासक्रमाच्या सर्वच शाळांत विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए तर अनेक विद्यार्थ्यांनी ९.५ सीजीपीएवर गुण घेतल्याची माहिती शाळांनी दिली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील शाळांचा निकाल उत्तम असल्याचे शाळांकडून सांगण्यात आलेल्या माहितीवरुन दिसत आहे. संकेतस्थळाच्या धिम्या गतीचा फटका सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहाव्या वर्गाचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल सकाळी जाहीर झाला. याची माहिती पूर्वीच जिल्ह्यातील शाळांना देण्यात आली होती. सर्व निकाल एकाच संकेतस्थळावर असल्याने देशभरातून एकाच वेळी गर्दी करण्यात आली. यामुळे संकेतस्थळाची गती धिमी झाल्याने शाळांना निकाल पाहण्याकरिता विलंब होत असल्याचे दिसून आले. याचा फटका शाळांना बसला.