आरटीईअंतर्गत दुर्बल घटकातील 1300 विद्याथ्र्याना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 06:00 IST
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बांलकांना 25 टक्के कोटय़ांतर्गत 2020-21 या शैक्षणिक सत्रकरिता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये आठही तालुक्यातील 124 शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नर्सरीकरिता हिंगणघाट व वर्धेतील प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे.
आरटीईअंतर्गत दुर्बल घटकातील 1300 विद्याथ्र्याना प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत राबविण्यात येणा:या आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये पहिलीकरिता 122 तर नर्सरीकरिता 2 शाळांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये 1 हजार 347 विद्याथ्र्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बांलकांना 25 टक्के कोटय़ांतर्गत 2020-21 या शैक्षणिक सत्रकरिता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये आठही तालुक्यातील 124 शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नर्सरीकरिता हिंगणघाट व वर्धेतील प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे. नर्सरिकरिता 48 तर पहिलीकरिता 1299 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे. याकरिता पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 11 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात असून आतार्पयत केवळ 369 विद्याथ्र्यानीच नोंदणी केली आहे. 29 फेब्रुवारीर्पयत ऑनलाईन नोंदणी चालणार असून 11 व 12 मार्च रोजी प्रवेशाकरिता लॉटरी पद्धतीने विद्याथ्र्याची निवड केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्याथ्र्यानी व पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.या कागदपत्रंची आवश्यकताआरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्याकरिता पालकांचा निवासी पुरावा, पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांगाकरिता 49 टक्के पेक्षा दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्रची आवश्यकता आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश घेताना विद्याथ्र्याच्या पालकांचा सन 2018-19 किंवा 2क्19-20 या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरावा. उत्पन्नाच्या दाखल्याकरिता सॅलरी स्लिप, तहसीलदारांचा दाखला, कंपनीचा किंवा कर्मचारी असल्याचा दाखला गृहीत धरावा. तसेच एस. ई. बी. सी. प्रवर्गाचा समावेश वंचित गटात करावा.पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सिंगल पॅरेंट (विधवा, घटस्फोटीत आई अथवा वडील या पैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावे, अशा सूचनाही शिक्षण विभागाच्या सहसचिवांनी दिल्या आहेत.