शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून फरार आरोपीला अटक

By admin | Updated: July 23, 2015 02:09 IST

वृक्षतोड करण्यास बनावट कागदपत्र तयार करण्याच्या प्रकरातील आरोपी धनराज अवजेकर रा. पिंपळखुटा याला खरांगणा पोलिसांनी सोमवारी पिंपळखुटा येथेच अटक केली.

खरांगणा (मो.) : वृक्षतोड करण्यास बनावट कागदपत्र तयार करण्याच्या प्रकरातील आरोपी धनराज अवजेकर रा. पिंपळखुटा याला खरांगणा पोलिसांनी सोमवारी पिंपळखुटा येथेच अटक केली. सदर आरोपी गत दोन महिन्यांपासून फरार होता. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.खरांगणा वनपरिक्षेत्रातील मौजा सुसुंद येथील सर्व्हे क्रमांक २२ मधील सागवान झाडे मासोद येथील शेख हफीज शेख नबी याने विकत घेतली होती. ही झाडे नंतर शेख हफीज याने नागपूरचे लाकूड व्यापारी विरेंद्र सुरानी यांच्यासोबत लाकूड विक्रीचा व्यवहार करण्याचे नियोजन केले होते. या सागवान झाडांच्या तोडीकरिता परवान्याची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे लक्षात आले. यावरून वन विभागाच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात धनराज अवजेकर, शेख हफीज शेख नबी आणि विरेंद्र सुराणा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली होती; पण धनराज अवजेकर हा फरार झाला होता. लाकूड तोडीची बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी धनराजनेच मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. यामुळे पोलिसांद्वारे आरोपीचा शोध घेतला जात होता; पण तो हाती लागला नाही. अखेर अवजेकर सोमवारी पिंपळखुटा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पिंपळखुटा गाठत त्यास अटक करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रशांत पांडे, सहायक उपनिरीक्षक वसंत इंगोले करीत आहेत.(वार्ताहर)