लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : काही वर्षांपूर्वी देवळी येथे वास्तव्यास आलेले लोहाराचे (खातकाम करणारे) कुटुंब आज लॉकडाऊन थोडे शिथिल झाल्यामुळे चिकणी, जामणी, पढेगाव येथे शेतीपयोगी साहित्याची दुरुस्ती करण्याकरिता निघाले.लोखंडाला गरम करून त्यास आकार देणे हा या कुटुंबीयाचा मुख्य व्यवसाय. यातून वेगवेगळ्या वस्तू तसेच शेतीपयोगी वस्तू तयार करणे, लोखंडी, पोलादी वस्तूंना धारदार बनविणे यामध्ये प्रामुख्याने वखर फास, कुऱ्हाड, विळा, छन्नी, सब्बल इत्यादी वस्तू तयार करणे व धारदार करणे आदी. हंगामी व अल्प कालावधीचे काम असल्यामुळे त्यांना दर तीन-चार दिवसांनी गाव बदलावे लागते. याकरिता ते बैलबंडीचा वापर करतात. मात्र, बंडीला जुंपण्याकरिता चाऱ्याअभावी बैल परवडत नसल्यामुळे अश्व जपावे लागत असल्याची खंत कुटुंब व्यक्त करीत आहे. बैलांना चरण्याकरिता जंगलातच न्यावे लागते किंवा महागडा चारा घ्यावा लागतो. मात्र, अश्वांचे तसे नाही, अश्व गावाभोवताल चरून नियोजित ठिकाणी येतात. यांचा चाराही विशेष महाग होत नाही.कोळसा झाला महागपूर्वी मोठ्या प्रमाणात कोळसा उपलब्ध असायचा. त्यामुळे गावोगावी सहज कोळसा उपलब्ध असायचा. आता मात्र तसे राहिले नाही. घरोघरी गॅस सिलिंडर आलेत. यामुळे लाकडी इंधन स्वयंपाक घरातून हद्दपार झाले. परिणामी, खेडेगावातही कोळसा मिळणे कठीण झाले. याकरिता लाकड विकत घेऊन कोळसा तयार करावा लागतो. हे काम करण्याकरिता कोळसा महत्त्वाचा घटक आहे, अशी माहिती या कुटुंबीयांनी दिली.
लोहाराच्या बंडीला अश्वाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST
लोखंडाला गरम करून त्यास आकार देणे हा या कुटुंबीयाचा मुख्य व्यवसाय. यातून वेगवेगळ्या वस्तू तसेच शेतीपयोगी वस्तू तयार करणे, लोखंडी, पोलादी वस्तूंना धारदार बनविणे यामध्ये प्रामुख्याने वखर फास, कुऱ्हाड, विळा, छन्नी, सब्बल इत्यादी वस्तू तयार करणे व धारदार करणे आदी. हंगामी व अल्प कालावधीचे काम असल्यामुळे त्यांना दर तीन-चार दिवसांनी गाव बदलावे लागते.
लोहाराच्या बंडीला अश्वाची साथ
ठळक मुद्देखातकाम करणाऱ्यांकडून शेतीसाहित्याची होतेय दुरुस्ती