प्रभाकर शहाकार पुलगावएकेकाळी शिक्षण क्षेत्रात जिल्ह्यात लौकीकप्राप्त इंडियन इंग्लिश मिडल स्कूलचे नामांतर करून नेताजी सुभाषचंद्र बोस ऩप़ हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज करण्यात आले़ नगर परिषदेच्या प्राथमिक शाळांनाही देशभक्त व वीरांची नावे देण्यात आली; पण आज शाळांची व तेथील शिक्षणाची वाताहत झाली आहे़ लाखो रुपये शिक्षण कर घेणाऱ्या पालिकेची शैक्षणिक परंपराच रसातळाला गेली आहे़तीन दशकांपूर्वी नगर परिषदेची नेताजी सुभाषचंद बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच शहीद भगतसिंग ऩप़ प्राथमिक शाळा, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर ऩप़ प्रा़ शाळा, राणी लक्ष्मीबाई ऩप़ प्राथमिक शाळा, ज्ञानेश्वर काळबांडे ऩप़ प्राथ़ शाळा या चार मराठी माध्यमाच्या तर चंद्रशेखर आझाद हिंदी प्रा़ शाळा क्ऱ एक व दोन या दोन हिंदी व टिपू सुलतान ऩप़ ऊर्दु प्रा़ शाळा अशा एकूण ७ शाळा व त्यात शिक्षण घेणारे जवळपास १५ हजार विद्यार्थी होते़ या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे ६४ प्राथमिक शिक्षक होते़ ६८ शिक्षकांना मान्यता असताना ४ शिक्षकांचा अनुशेष होता़ नागरिकांना मुलभूत सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगर प्रशासनाची आहे़ यासाठी पालिका नागरिकांकडून दरवर्षी मालमत्ता करासह पाणी, शिक्षण, वृक्ष संगोपन व स्वच्छता कराची वसुली करते; पण काही काळापासून नगर पालिका प्रशासन दर्जेदार शिक्षण देण्यापासून परावृत्त झाली आहे़ नगर परिषद शाळेकडे एकेकाळी विद्यार्थी व पालकांची धाव असायची़ ती कमी झाली़ नगर परिषदेच्या शाळांत विद्यार्थ्यांची गळती सुरू झाली आहे़ सुभाषचंद्र बोस ऩप़ हायस्कूलचीही विद्यार्थी संख्येबाबत तीच स्थिती आहे़ शिक्षण करापोटी लाखो रुपये घेणाऱ्या पालिकेने दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम राखणे गरजेचे आहे़पाच शाळांत ३५० विद्यार्थी व ११ शिक्षकपालिकेच्या उदासीन धोरणामुळे उर्वरित ३ मराठी, १ हिंदी व १ उर्दु अशा पाच शाळांत केवळ ३५० विद्यार्थी शिक्षण घेताहेत तर केवळ ११ शिक्षक कार्यरत आहेत़पालिकेचा हिंदी विभागही बंदया विद्यार्थी संख्येचा पहिला फटका नगर परिषद हायस्कूलच्या हिंदी विभागाला बसला़ सर्वप्रथम हा विभाग बंद करण्यात आला़ इतकेच नव्हे तर या विभागाची इमारतही नेस्तनाबूत करण्यात आली़ प्राथमिक शाळांतही गळतीपूढे क्रमाक्रमाणे प्राथमिक शिक्षणाच्या दालनाला विद्यार्थी गळतीची झळ बसली़ ज्ञानेश्वर काळबांडे ऩप़ प्रा़ शाळा व हिंदी प्रा़ शाळा क्ऱ २ बंद पडली़ दोन वर्षांत नेताजी सुभाषचंद बोस हायस्कूल व कनिष्ठ महा़चे अकरा व बारावीचे वर्ग विद्यार्थी संख्येअभावी शिक्षण विभागाकडून बंद करण्यात आले़ शिक्षकांचे समायोजनएकेकाळी लौकीकप्राप्त हायस्कूल व विद्यार्थी संख्येकडे पालिकेला लक्ष पुरविता आले नाही़ या विभागातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतर संस्थांत समायोजन करण्यात आले़ इमारत भूईसपाट१९२८ मध्ये म्हणजे इंग्रजांच्या राजवटीत बांधण्यात आलेली शाळेची इमारतही भूईसपाट करण्यात आली़ यामुळे नगर परिषदेचा शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार शिक्षणाचा सुवर्णकाळ संपुष्टात आल्याचेच दिसते़
शिक्षण कर घेणाऱ्या पालिकेची शैक्षणिक परंपरा रसातळाला
By admin | Updated: January 23, 2015 01:50 IST