शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचा दुधाने अभिषेक

By admin | Updated: June 3, 2017 00:27 IST

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी वर्धेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढताना दिसला.

शेतकरी संपाचा दुसरा दिवस : शेतकऱ्यांकडून वाढत्या प्रतिसादाने संप भडकला लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी वर्धेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढताना दिसला. यामुळे हे आंदोलन चांगलेच भडकत असल्याचे दिसून आले आहे. वर्धेत आज दूध उत्पादकांनी बजाज चौक परिसरात शासन विरोधी नारे नेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक केला. तर आष्टी तालुक्यात स्वाभीमानी शेतकरी संघटना तर तळेगाव येथे शिवसेनेच्यावतीने रस्त्यावर भाजीपाला टाकत निषेध नोंदविला. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपात वर्धेत सहभागी होत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. पहिल्या दिवशी केवळ काही दूध उत्पादकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून निषेध नोंदविला. तर हिंगणघाट व आष्टीत निवेदन देत या संपात सहभागी होत असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला दिला. सर्वत्र सुरू असलेल्या संपात आज अनेक शेतकऱ्यांनी सहभागी होत आपला रोष व्यक्त केला. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खडकी सिरसोली चौक परिसरात एकत्र येत आंदोलन केले. यावेळी संघटनेचे जिल्हा प्रमुख आशिष वाघ यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजी, कांदा व दूध फेकत निषेध नोंदविला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, उत्पादनाच्या दीडपट खर्च मिळण्यात याव्या आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात संघटनेचे तालुका प्रमुख पवन नागपूरे यांची उपस्थिती होती. यानंतर शेतकऱ्यांचा मोर्चा राष्ट्रीय महामार्गावर वळला. तळेगाव येथे पोहोचत शेतकऱ्यांनी मुख्यमार्गावर भाजीपाला टाकत निषेध नोंदविला. येथे शिवसेनेनेही आंदोलन केले. येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. बजाज चौकात दूध उत्पादकांचे आंदोलन शेतकरी संपादरम्यान वर्धेतील दूध उतपाकांकडून संपाच्या सातही दिवसात दूध रस्त्यावर टाकण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. गुरुवारी या दूध उत्पादकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन केले. तर आज बजाज चौक परिसरात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला दूधाचा अभिषेक करीत आंदोलन केले. यावेळी मंत्र म्हणून शासनाविरोधी नारे त्यांच्याकडून देण्यात आले. या आंदोलनात भूगाव, तळेगाव (टालाटुले) येथील दूध उत्पादकाचा समावेश होता.