शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाख रुपयांचा सुगंधीत तंबाखू जाळला

By admin | Updated: October 9, 2015 02:29 IST

अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासन वर्धा कार्यालयाने वेळोवेळी कारवाई करून जप्त केलेला सुगंधीत तंबाखू, ...

अन्न व औषधी विभागाची कारवाईवर्धा : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासन वर्धा कार्यालयाने वेळोवेळी कारवाई करून जप्त केलेला सुगंधीत तंबाखू, पान मसाला व इतर अन्नपदार्थ गुरुवारी इंझापूर येथील डंपिंग यार्ड मध्ये जाळला. यावेळी एकूण ७ लाख ९६ हजार ४०३ रुपयांचा साठा नष्ट करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अन्न व औषध प्रशासन विभागाने २०१२ पासून सुगंधीत तंबाखू, पानमसाला, गुटखा व खर्रा इत्यादी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री, साठवणूक, वितरण व निर्मितीवर प्रतिबंध घातलेला आहे. असे असतांना सुध्दा चोरट्या पध्दतीने सुगंधीत तंबाखू व पानमसाला आदीची विक्री करण्यात येत आहे. यानुसार करवाई करून मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध कारवाईतून जप्त करण्यात आलेला गुटखा व इतर साहित्याची प्रकरणे सहायक आयुक्त (अन्न) वर्धा यांना प्रकरण सादर करण्यात आले. त्यांनी सदर साठा प्रतिबंधीत असल्याने नष्ट करण्याचे आदेश पारित केले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यावेळी पंचासह, आरोपी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व अधिकारी उपस्थित होते. सदरची संपूर्ण कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) वर्धाचे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तिवारी, धाबर्डे, नंदनवार यांच्यासह सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली.(प्रतिनिधी)