शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाखांचा दारूसाठा जप्त

By admin | Updated: July 16, 2016 02:27 IST

पांढुर्णा, मध्यप्रदेश येथून जिल्ह्यात दारूची तस्करी होते असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे पोलिसांनी सापळ रचून केलेल्या ..

मध्यप्रदेशातून तस्करी : तिघांवर गुन्हे दाखल वर्धा : पांढुर्णा, मध्यप्रदेश येथून जिल्ह्यात दारूची तस्करी होते असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे पोलिसांनी सापळ रचून केलेल्या कारवाईत वाहनासह ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंदी (मेघे) मार्गे पोद्दार बगीचा, वर्धा येथे तीन चाकी मालवाहू क्रमांक एमएच ३२ क्यू ४५१४ ने देशी-विदेशी दारूचा साठा विक्रीकरिता येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. तसेच पेट्रोलींगकरिता एक कार क्र. एमएच ३२ एक्स ८४२० ही देखील आहे. या आधारे सिंदी(मेघे) येथे सापळा रचण्यात आला. दरम्यान समोरून एक कार व मालवाहु वाहन येत असल्याचे पोलीस पथकाला दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता सदर वाहन थांबविले. वाहनाची झडती घेतली असता यात देशी व विदेशी दारूच्या १८० मिलीच्या १ हजार ८६८ शिश्या आढळल्या. तर ७५० मिलिच्या ८४ बाटली आढळून आल्या. यात मालवाहक क्र. एमएच ३२ क्यू ४५१४, व कार क्र. एमएच ३२ एक्स ८४२० असे एकूण ७ लाख ५० हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी शंकर किसनचंद दणानी (३८) रा. पोद्दार बगीचा, वर्धा, जगदीश नंदलाल प्रजापती (३२) रा. सिंदी (मेघे), वर्धा, लालू जयस्वाल, रा. पांढुर्णा जि. छिंदवाडा यांच्याविरूद्ध रामनगर पोलीस ठाण्यात मुदाका कलम ६५ (अ)(ई), ७७ (अ), ८२,८३ अन्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात पराग पोटे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस पथक नामदेव किटे, दीपक जाधव, वैभव कट्टोजवार हरिदास काकड, अमित शुक्ला यांनी केली.(स्थानिक प्रतिनिधी)