शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या भुयारी गटार योजनेसाठी ७५ कोटी

By admin | Updated: March 19, 2017 00:46 IST

शहरातील नाले व नाल्या भुयारी करण्यासाठी अमृत अभियानांतर्गत ७५ कोटी रुपयांचा निधी सन २०१७-१८ मध्ये उपलब्ध होणार ...

वर्धेच्या आमदारांची माहिती : शहरातून वाहतात सात नाले वर्धा : शहरातील नाले व नाल्या भुयारी करण्यासाठी अमृत अभियानांतर्गत ७५ कोटी रुपयांचा निधी सन २०१७-१८ मध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिली. हा निधी लवकरच प्राप्त होणार असून या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. वर्धा पालिकेच्या हद्दीत सात मोठे नाले व ८२ कि.मी. च्या नाल्या आहेत. सदर नाले व नाल्या उघड्या असल्यामुळे शहरवासियांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. सोबतच त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. वर्धा शहरात भुयारी गटारी योजना कार्यान्वित व्हावी यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. या योजनेत राज्यातील ४४ शहरे असून त्यात वर्धा एक आहे. या योजनेंतर्गत वर्धा शहरातील पाणी पुरवठा योजनेसाठी ३५.२६ कोटी रुपये मंजूर झाले होते. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून पाईपलाईन टाकण्याचे काम शहरात सुरू आहे. पालिका निवडणुकीच्या काळात आ.डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भुयारी गटारी मार्गासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ७५ कोटी रुपयांचा वर्धा शहर भुयारी गटार प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत आ.डॉ. पंकज भोयर यांना नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी निलेश पोतदार यांनी गुरुवारी पत्र दिले आहे. सदर पत्रात प्रकल्पासाठी ७५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे कळविले आहे. या प्रकल्पांतर्गत वर्धा शहरातील ७ नाल्यांचे दहा कि.मी. चे भुयारी गटार मार्गामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. सोबतच शहरातील ८२ कि.मी.च्या नाल्या भुयारी करण्यात येणार आहे. या नाल्यांना शहरातील २५ हजार घरामधील सांडपाणी नालीने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती व दुर्गंधीपासून शहरवासियांची सुटका होणार आहे. वर्धा शहरातील सांडपाणी एका ठिकाणी जमा करून त्यावर प्रक्रिया करून सदर पाणी बगीचा, शेती व उद्योगासाठी दिल्या जाणार आहे. त्यामुळे नगर पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे राहणार आहे. यामुळे शहरातील गंभीर समस्या निकाली निघाणार असल्याची माहिती आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिली.(प्रतिनिधी)