शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सिंदी पालिकेचा ६.३९ कोटींचा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 11, 2015 01:43 IST

नगर पालिकेने ६.३९ कोटीच्या अर्थसंकल्पाला विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजुरी दिली. हा अर्थसंकल्प नगराध्यक्ष सुनिता कलोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला.

सिंदी (रेल्वे): नगर पालिकेने ६.३९ कोटीच्या अर्थसंकल्पाला विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजुरी दिली. हा अर्थसंकल्प नगराध्यक्ष सुनिता कलोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला. यात विकासकामांवर भर आहे. गत वर्षिची शिल्लक ५७ लाख १८ हजार रुपये असून नगराध्यक्षांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडला तो सर्वांनुमते संमत करण्यात आला. अर्थसंकल्पात घरकुल, आरोग्य सेवेकरिता पूर्ण अनुदान, विशेष रस्ता अनुदान, रस्ता अनुदान, १३ वा वित्त आयोग, नागरी भागातील दलित वस्ती सुधारणा, अल्पसंख्यक इत्यादी विभागातील विकास कामांचे नियोजन करण्यात आले. सन २०१५-१६ मध्ये होणाऱ्या खर्चात घरकुल बांधकामाकरिता १५ लक्ष, विशेष रस्ता अनुदानान म्हणून १.७६ कोटी, १३ वा वित्त आयोग ४० लक्ष, नागरी भागातील दलित वस्तीकरिता ३५ लक्ष, अल्पसंख्यक १० लक्ष, वैशिष्टपुर्ण अनुदान म्हणून ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही नगर पालिका ‘क’ वर्ग असून जिल्ह्यातील सर्वात लहान आहे. यामुळे नगरपालिकेचे स्वत:चे उत्पन्न अत्यल्प आहे. या अल्पशा उत्पन्नात सिंदी शहराचा विकास शक्य नसल्याने शासनाच्या विविध योजनेमधून तसेच जिल्हा नियोजन समितीकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून सिंदी शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यावर नगराध्यक्षांनी भर दिला. सदर सभेत सिंदी शहराच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने भर देण्यात आला आहे. नगर परिषदेंतर्गत येत असलेल्या म्यु. नेहरू विद्यालयाला १०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे शताब्दी महोत्सव कार्यक्रमाकरिता अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे. सन २०१५-१६ चे उत्पन्न ६ कोटी ३९ लाख १२ हजार २७२ असून खर्च ६ कोटी ३६ लाख ३२ हजार ५०० रुपये आहे. या सभेला परिषदेचे नगरसेवक उपस्थित होते. अंदाजपत्रकाचे वाचन प्रभारी लेखापाल सलीम बेग यांनी केले.(प्रतिनिधी)