शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार ७४ शेतकरी वीज मिटरच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 9, 2014 23:49 IST

जिल्ह्यातील पाच हजार ७४ शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून वीज मिटर लावण्याची प्रतीक्षा आहे. विद्युत वितरण कंपनीच्यावतीने कृषीपंप विद्युत जोडणी उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून

वायगाव (नि.) : जिल्ह्यातील पाच हजार ७४ शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून वीज मिटर लावण्याची प्रतीक्षा आहे. विद्युत वितरण कंपनीच्यावतीने कृषीपंप विद्युत जोडणी उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून शेतकऱ्यांचा ओलिताचा प्रश्न सुटावा हा उद्देश आहे. मात्र अंमलबजावणी अभावी याचा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे.कृषीपंपाने शेतीकरिता मुबलक पाणी मिळावे म्हणून विद्युत मिटर लावण्याचे निकष आहे. यासाठी विद्युत वितरण कंपनीकडे सहा हजार ६०० रूपये डिमांड म्हणून जमा करावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्युत मिटर दिले जाते. मात्र जिल्ह्यातील देवळी विभागातील १ हजार १६६ कृषी विद्युत मिटरची प्रतीक्षा आहे. तसेच आर्वी विभागात १ हजार ९५८ तर हिंगणघाट विभागात १ हजार ९५० असे एकुण ५ हजार ७४ शेतकरी विद्युत मिटरच्या प्रतीक्षेत आहे. यातील सर्व शेतकऱ्यांनी मिटरसाठी डिमांड भरले आहे. तरीही दोन वर्षापासून वीह मितरची प्रतीक्षा आहे. विद्युत वितरण कंपनीकडून या शेतकऱ्यांना मिटर जोडणी दिलेली नाही. या शेतकऱ्याच्या शेतात अद्याप मिटरची जोडणी न केल्याने शेतकऱ्याना ओलिताचा प्रश्न सतावत आहे. यामुळे दरवर्षी नाहक लाखो रूपयाचे नुकसान सोसावे लागत आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी रब्बी पिकांत चना, गहू, कडधान्य व पालेभाज्याचे लागवड करतात. रब्बी पिकाकरिता ओलिताची गरज भासते. यासाठी शेतकरी डिझेलपंप लावून पिकांना पाणी देतात. मात्र डिझेलचा खर्च परवडत नसल्याने बरेचदा शेतकरी हात आखडता घेतात. ही गैरसोय टाळण्याकरिता शेतकऱ्यांनी वीज मिटरकरिता डिमांड भरुनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. यातच यंदा शेतकरी कोरडा दुष्काळाचा सामना करीत असल्याने पिकांना ओलिताची गरज आहे. याकरिता विद्युत मिटर व जोडणीची आवश्यकता शेतकऱ्यांना आहे. काही शेतकऱ्यांच्या अद्याप वीज पोहोचली नाही. कृषी मंत्रालयाकडून विद्युत वितरण कंपनीला अनुदान मिळालेले नाही, अशी माहिती आहे. मत्र शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लगत आहे. डिमांड भरुनही शेतकरी वीज जोडणीकरिता कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याची स्थिती आहे. यामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहे. (वार्ताहर)