शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४९३ सौरदिवे भंगार

By admin | Updated: July 10, 2014 23:44 IST

पाण्याचा व कोळशाचा तुटवडा आणि विजनिर्मितीसाठी तोकडी भांडवलव्यवस्था यावर पर्याय शोधण्यासाठी राज्य शासनाने गाव तिथे सौर दिवे कल्पना उदयास आणली. त्याची अंमलबजावणीही झाली;

अमोल सोटे - आष्टी (श़)पाण्याचा व कोळशाचा तुटवडा आणि विजनिर्मितीसाठी तोकडी भांडवलव्यवस्था यावर पर्याय शोधण्यासाठी राज्य शासनाने गाव तिथे सौर दिवे कल्पना उदयास आणली. त्याची अंमलबजावणीही झाली; मात्र देखभाल व दुरुस्तीअभावी आजघडीला वर्धा जिल्ह्यातील २१७ ग्रामपंचायतीमधील ४९३ सौरदिवे भंगार झाले आहेत. शासनाची लाखो रुपयाने धूळदान झाली आहे. गावकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने सौरदिवे संकल्पना लगेच संपुष्टात येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.वर्धा जिल्हा निर्मल, हागणदारीमुक्त, रोजगाराभिमुख, उर्जासंपन्न व्हावा म्हणून शासनाच्या अनेक योजना तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने यांनी राबविल्या. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि सरपंच यांच्या परिश्रमातून अनेक समस्या मार्गी लागल्या. शासनाच्या पर्यावरण ग्राम संतुलीत समृद्ध प्रकल्प, पाणलोट प्रकल्प, तंटामुक्त गाव समिती पुरस्कार योजनांसह विविध योजनेमधून गावागावात सौरउर्जेवरील दिवे लागवण्यात आले. एका दिव्यासाठी १२ ते १५ हजार रुपये खर्च झाला.जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास वर्धा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीमध्ये ६० सौरदिवे, समुद्रपूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतमध्ये २६ दिवे, हिंगणघाट तालुक्यातील ४० ग्रामपंचायत मध्ये ८३ दिवे, देवळी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतमध्ये ३७ दिवे, सेलू तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीमध्ये ५२ दिवे, आर्वी तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीमध्ये १०२ सौरदिवे, आष्टी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीमध्ये ६५ दिवे तर कारंजा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीमध्ये ६८ सौरदिवे लावण्यात आले.सन २०१२-१२, २०१२-१३ या वर्षात ८० टक्के तर सन् २०१३-१४ वर्षात २० टक्के सौरदिवे बसविण्यात आले. हे दिवे कंपनीकडून खरेदी केल्यावर ग्रामपंचायतीला पाठविण्यात आले. ग्रामसभेतून वॉर्डनिहाय गरज लक्षात घेत त्यांचे वितरण करण्यात आले. दिवे लावण्याकरिता सिमेंट-काँक्रीटच्या खड्यात पोल उभारण्यात आले. सौरउर्जावर असल्यामुळे या दिव्यांचा फायदा होईल असे गावकऱ्यांना वाटत होते; पण गावातील काही भुरट्या चोरांची नजर सौरउर्जेवरील दिव्यांच्या बॅटरीवर गेली. टप्प्याटप्प्याने बॅटरी व काही उपकरणे चोरी जाण्याच्या घटना घडू लागलया. बॅटऱ्या नसल्याने हे दिवे भंगार बनले आहे. आता दिव्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे जवळपास ९० टक्के सौरदिवे पांढरा हत्ती बनले आहे. या दिव्यांचा प्रकाश ग्रामीण भागातील नागरिकांकरिता सध्या तरी कठीण झाला आहे.