शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीयत 4,414, तर खासगी केंद्रांवर 535 वृद्धांनी घेतलीय लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST

१ मार्चपासून अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींसह वयोवृद्धांनाही कोरोनाची लस देण्याचे शासनाने निश्चित केल्यावर वर्धा जिल्ह्यातही प्रत्यक्ष लसीकरण केले जात आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावरून कोविडची लस देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील २८पैकी २० प्राथमिक आरोग्य केंद्रांवरून सोमवार ८ मार्चपासून प्रत्यक्ष लसीकरणही केले जात आहे.

ठळक मुद्देसात दिवसांची स्थिती : १ हजार ३७० अतिजोखमीच्या व्यक्तींचे व्हॅक्सिनेशन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात १ मार्चपासून तीन खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या तीन खासगी लसीकरण केंद्रांसह जिल्ह्यातील गाव पातळीवर असलेल्या लसीकरण केंद्रांवर वयोवृद्ध तसेच अतिजोखमीच्या व्यक्ती स्वयंस्फूर्तीने येत कोरोनाची लस घेत आहेत. मागील सात दिवसांचा विचार केल्यास ४ हजार ४१४ वृद्धांनी शासकीय केंद्रांवरून, तर ५३५ वयोवृद्धांनी खासगी लसीकरण केंद्रांवरून कोरोनाची व्हॅक्सिन घेतली आहे. अतिजोखमीच्या गटात येणाऱ्या तब्बल १ हजार ३७० व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. १ मार्चपासून अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींसह वयोवृद्धांनाही कोरोनाची लस देण्याचे शासनाने निश्चित केल्यावर वर्धा जिल्ह्यातही प्रत्यक्ष लसीकरण केले जात आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावरून कोविडची लस देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील २८पैकी २० प्राथमिक आरोग्य केंद्रांवरून सोमवार ८ मार्चपासून प्रत्यक्ष लसीकरणही केले जात आहे. १ ते ८ मार्च या कालावधीचा विचार केल्यास शासकीय लसीकरण केंद्रांवरून ६ हजार ६१३ व्यक्तिंना कोविडच्या लसीचा पहिला डोस, तर २ हजार ३७४ व्यक्तिंना कोविडच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. कोविड लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांमध्ये १ हजार ३६ अतिजोखमीचे, तर ४ हजार ४१४ वयोवृद्धांचा समावेश आहे. 

लसीकरण केंद्रांवरून देण्यात येणारी लस पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यांनी कुठलीही भीती न बाळगता नोंदणी करून कोरोनाची लस घ्यावी.- डॉ. प्रभाकर नाईक, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

सिंदी रेल्वे येथे शासकीय रुग्णालयात लसीकरणाला सुरूवात झाल्यावर आपण लसीकरण करून घेतले. नागरिकांनीही कोरोना लस घ्यावी याचे कुठलेही दुष्पपरिणाम नाही. गैरसमज व भिती दुर करावी- प्रकाशचंद्र डफज्येष्ठ नागरिक, सिंदी (रेल्वे)

कोरोना लस ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. यासाठी ॲपद्वारे नोंदणी करून आपण शासकीय रुग्णालयात लसीकरण करून घेतले आहे. लसीचा कुठलाही प्रादुर्भाव जाणवला नाही.- अरूण वांदिलेज्येष्ठ नागरिक, सालोड (हिरापूर)

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस