शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

४०० किलो रद्दी विकून गरजूंना दिल्या वस्तू

By admin | Updated: March 11, 2017 00:36 IST

रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून काबाडकष्ट करणाऱ्या गरजुंना छत्री व चप्पलचे वितरण करण्यात आले.

उन्हापासून बचावाकरिता चप्पलचे वाटप : भाजयुमो आणि सेवार्थ फाऊंडेशनचा उपक्रम वर्धा : रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून काबाडकष्ट करणाऱ्या गरजुंना छत्री व चप्पलचे वितरण करण्यात आले. याकरिता भाजपा युवा मोर्चा तसेच सेवार्थ फाऊंडेशनच्या युवकांनी पुढाकार घेतला. या उपक्रमासाठी ४०० किलो रद्दी गोळा करून त्याही विक्री करीत निधी उभा केला. या अभिनव उपक्रमातून गरजूंना कपडे तसेच उन्हापासून बचावासाठी छत्री व चप्पल भेट दिली. भाजयुमोचे महामंत्री हर्ष तिवारी यांनी सेवार्थ फाऊंडेशनच्या मदतीने हा उपक्रम राबविला. आजही समाजात आर्थिकदृष्टया मागास असलेल्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेस्टेशन, बस स्थानक, शहरातील मंदिरांपुढे अनेक गरजू दिसतात. मिळेल ते खाऊन त्यांचा उदरनिर्वाह होतो. पायात चप्पल नसते तर डोक्यावर छत नसल्याने उन्हात तसेच राहावे लागते. त्यांना सावली मिळावी म्हणून युवकांनी पुढाकर घेत हा उपक्रम राबविला. हर्ष तिवारी यांनी सहकारी व मित्रांकडून सुमारे ४०० किलो रद्दी गोळा केली. ती रद्दी विकून त्यातून मिळालेल्या पैशातून चप्पल व कपडे उन्हापासून वाचण्यासाठी छत्र्या विकत घेतल्या. हे सर्व साहित्य शहरातील मंदिर, रेल्वेस्थानक परिसर, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी असलेल्या गरजूंना भेट स्वरूपात देण्यात आले. या उपक्रमाचा लाभ शेकडो गरजुंना मिळाला. यावेळी भाजपाचे प्रशांत बुर्ले, विरू पांडे, अभिषेक त्रिवेदी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सेवार्थ फाऊंडेशनचे विशाल तिवारी, गौरव अग्निहोत्री, चेतन भुतडा, अमित चौबे, आयुष पालीवाल, अंकीत इंगळे, शुभम महत्वाने, चेतन दोषी, शुभम साहू, अंकीत परियाल, जतीन पटेल, अभिषेक तिवारी, बिरजू श्रीवास, रजत शर्मा, रोहित शर्मा, संकेत प्रजापती, राहुल बाजपेयी, शुभम जयस्वाल, दुष्यंत पटेल, मयुर तिवारी, राम पांडे, बंटी लोंढे, लखन लोंढे, अजय हातागळे, आकाश राखडे, कुमार शेंडे, हर्षल चोरतकर, नवीन अग्निहोत्री, अमीत पांडे, श्रावण दखोले आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)