शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

४०० हेक्टर पिकांचे होणार सिंचन

By admin | Updated: July 22, 2015 02:41 IST

राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. यात नाला खोलीकरण, सरळीकरण व अन्य उपाययोजना केल्या जात आहे.

आष्टी (श.) : राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. यात नाला खोलीकरण, सरळीकरण व अन्य उपाययोजना केल्या जात आहे. तालुक्यातही हे अभियान राबविले जात असून लहानआर्वी येथे नाला खोलीकरणामुळे तब्बल ४०० हेक्टर पिकांचे सिंचन होणार आहे. लहानआर्वी येथील नाला शेताच्या मधोमध होता. यामुळे पावसाळ्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. गत २०-२५ वर्षांपासून सदर नाला गाळाने बुजला होता. यामुळेही पावसाचे पाणी शेतातून वाहून जात होते व पिके खरडली जात होती. या नाल्याचे खोलीकरण झाल्यास पिकांचे नुकसान टाळता येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन लहानआर्वीचे सरपंच सुनील साबळे यांनी तशी मागणी कृषी विभागाकडे केली. यावरून कृषी विभाग व बजाज फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे काम हाती घेण्यात आले. परिसरातील सर्व नाल्यांचे पाणी एकत्र करून मुख्य नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. सर्वत्र वाहून जाणारे पाणी या नाल्यात गोळा झाल्याने तब्बल ४०० हेक्टरवर पिकांचे सिंचन शक्य झाले आहे. सर्व नाल्यांचे पाणी मुख्य नाल्यात साठविले जाणार असल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळणे शक्य झाले आहे. लहानआर्वी येथील शेतकरी, सरपंच आणि कृषी विभागाच्या सहकार्याने शेतजमीन सिंचनाखाली आल्याने समाधान व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)शेतपिकांचे नुकसान टळणार !लहानआर्वी येथील मुख्य नाला पूर्वी शेताच्या मधोमध होता. शिवाय गत २० ते २५ वर्षांपासून सफाई न झाल्याने नाला गाळाने बुजला होता. यामुळे पावसाळ्यात पिकांचे अतोनात नुकसान होत होते. नाल्यातील पाणी शेतातून वाहून जात असल्याने पिके खरडून निघत होती. या नाल्याला मिळणाऱ्या अन्य नाल्यांतील पाणीही शेतांतून वाहत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानास सामोरे जावे लागत होते. लहानआर्वी येथील सरपंच साबळे यांनी पुढाकार घेत कृषी विभागाकडे नाला खोलीकरण व सरळीकरणाची मागणी लावून धरली. यावरून कृषी विभागानेही सदर नाल्याच्या खोलीकरणाचे काम हाती घेतल्याने तब्बल ४०० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणणे शक्य झाले आहे. नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे शेतांतून वाहून जाणारे पाणी थांबणार असून पिकांचे नुकसानही टाळता येणार आहे.