शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानावर ३,५०० क्विंटल सोयाबीन बियाणे

By admin | Updated: June 30, 2017 01:42 IST

शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात.

महाबीजकडून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी : काही कृषी केंद्रांवर अनागोंदीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांकरिता एकूण ३ हजार ५०० क्विंटल बियाणे अनुदानावर देण्याचा निर्णय झाला आहे. याचा लाभ साधारणत: ११ हजार ६६६ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला आहे. गत आठवड्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना ब्रेक दिला होता. केवळ कपाशीची लागवड होत होती. या आठवड्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांकरिता लगबग सुरू केली आहे. शासनाच्यावतीने देण्यात येत असलेल्या अनुदानित बियाण्यांकरिता काही भागांत कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांना अनुदानीत बियाणे देण्यास टाळटाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. तर आर्वी तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे म्हणत काही शेतकऱ्यांनी बियाणे परत केल्याचा प्रकार घडला आहे. बियाणे पुरविण्याची जबादारी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि कृभको यांना देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांकडून सोयाबीनसह इतर पिकांचा पेरा सुरू आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची निवड तालुका स्तरावरच होत असल्याचे दिसून आले आहे. महाबीजने पुरविले केवळ १,२०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येत असल्या बियाण्यांची पुर्तता करण्याकरिता महाबीजला २ हजार ८०० क्विंटल बियाणे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली. असे असताना त्यांच्याकडून केवळ १ हजार २०० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. तर राष्ट्रीय बीज निगमला ३५० आणि कृभकोला ३५० क्विंटल बियाणे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बियाण्यांवर २५ टक्के सूट शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना बियाण्यांवर २५ टक्के सूट देण्यात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. शासकीय बियाणे घेण्याकरिता तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी होत असल्याचे दिसून आले आहेजिल्ह्याच्या कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचनेनुसार बियाणे पुरविण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार २०० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. कंपनीकडे बियाण्यांचा तुटवडा नाही. कृषी विभागाने सुचना केल्यास आणखी बियाणे पुरविण्यात येईल. - अजय फुलझले, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वर्धा.अनुदानावर बियाणे देण्याच्या सूचना निवड करण्यात आलेल्या कृषी केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत. यात कुठे बियाणे देण्यास टाळाटाळ होत असल्याची ओरड नाही. तसे असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी कार्यालयात संपर्क साधावा. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.