लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराच्या विकासाकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नव्याने ३५ कोटी रुपये मंजूर केले आहे. तसे पत्र त्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे सुपूर्द केले आहे.नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपये देण्याचे वचन दिले होते. ते पूर्णत्त्वास जात असल्याचे आ. डॉ. भोयर यांनी म्हटले आहे.नगरपालिका निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी शहरातील कोट्यावधी रुपयांच्या विकासाकामांचे भूमिपुजन केले होते. यावेळी त्यांनी वर्धा नगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत द्या, मी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देईल, असे वचन दिले होते. दरम्यान वर्धा नगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. तसेच नगराध्यक्षही भाजपाचा विराजमान झाला. या वचनाची पूर्ती करण्यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान शहराच्या विकासासाठी ३५ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे, असे पत्र ना. मुनगंटीवार यांनी आमदारांना दिले.१०० कोटींपैकी ३५ कोटी रुपयांची रक्कम शहराच्या विकासासाठी प्राप्त झाली असून उर्वरित ६५ कोटीची रक्कमही लवकरच शहराच्या विकासासाठी मिळेल असा आशावादही डॉ. भोयर यांनी व्यक्त केला.या निधीतून माध्यमातून शहरातील रस्ते, नाल्या, सुशोभीकरण, उद्यान व अन्य विकासात्मक कामे करण्यात येणार आहे. सदर निधी अंतर्गत होणारी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक असावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यापूर्वीच प्रशासनाला दिले आहेत.
वर्धेच्या विकासाकरिता ३५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:24 IST
शहराच्या विकासाकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नव्याने ३५ कोटी रुपये मंजूर केले आहे.
वर्धेच्या विकासाकरिता ३५ कोटी
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी दिले पत्र : पंकज भोयर यांची माहिती