शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठ्यासह ३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:57 IST

पोळा, गणेशोत्सव आदी सणादरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने पुलगाव पोलिसांनी रविवारी सकाळी नजीकच्या वायफड पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट मोहीम’ राबविली.

ठळक मुद्देतिघांविरुद्ध गुन्हा : पुलगाव पोलिसांची ‘वॉश आॅऊट मोहीम’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोळा, गणेशोत्सव आदी सणादरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने पुलगाव पोलिसांनी रविवारी सकाळी नजीकच्या वायफड पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट मोहीम’ राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी गावठीदारूसह ३.४२ लाखाचा मुद्देमाल जप्त करून तिघांविरुद्ध दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.वायफड पारधी बेडा परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळून ती परिसरातील गावांमध्ये विकल्या जात असल्याची माहिती पुलगाव पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वायफड पारधी बेड्यावर रविवारी सकाळी छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. सदर मोहिमेदरम्यान पोलिसांनी गावठी दारू, ४७ लोखंडी ड्राममधील ४ हजार ७०० लिटर कच्चा मोह रसायन सडवा व गावठी दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ३ लाख ४२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पोलिसांनी जमीनित लपवून ठेवलेला लोखंडी ड्राम मधील कच्चा मोह रसायन सडव्याचा शोध घेवून तो नष्ट केला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी दहेगाव (गावंडे) येथील श्रावण तुळशीराम नागोसे (३५), सुभेता जमसिंग भोसले (३५) व रूबिना नवरसिंग भोसले (३०) दोन्ही रा. वायफड पारधी बेडा यांच्याविरुद्ध पुलगाव पोलिसात दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, ए. एस. सैय्यद, चेतन मराठे, प्रकाश लसुंते, विवेक धनुले, संजय रिठे, विजय चव्हाण, महेंद्र काबंळे, भारत पिसुड्डे, किशोर लंभाने, अनिल भोवरे, कासदेकर, अमोल हातराम, निकेश गुजर, उमेश उईके, पवन निलेकर, राहुल साठे, सीमा लोखंडे यांनी केली. परिसरात दारूविक्रीचा व्यवसाय सुरू असल्यास माहिती देण्याचे आवाहन ठाणेदार बुराडे यांनी केले आहे.